शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदल पिकांना घातक

By admin | Updated: March 1, 2016 01:52 IST

डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने

बोर्डी : डहाणू तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून धुके ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, आंबा, सफेद जांभू आदी पिकांवर अनिष्ठ परिणाम होण्याची दाट शक्यता असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी व बागायतदारांना ग्रासले आहे. पंचायत समिती कृषी विभागात प्रतिबंधात्मक कीडनाशक औषधे तसेच फवारणी पंपाचा तुटवडा असल्याने महागडी औषध खरेदीमुळे बळीराजा हवालदिल बनला आहे.डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून नगदी पीके घेण्याचा कल वाढला आहे. सागरी आणि डोंगरी भागात वांगी, मिरची, तसेच कारली, दुधी, शिराळे या वेलवर्गीय पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारखाना, बांधकाम आणि वीटभट्टी मजुरही शेतीकडे वळले आहेत. मिरची पिकातून भरघोस आर्थिक लाभ होतो. परंतु ते किड व रोगांना लवकर बळी पडते. गेल्या पंधरा दिवसापासून दाट धुके, आणि वातावरणातील बदलाचा फटका भाजीपाला पिकांवर दिसू लागला आहे. भुरी, पांढरीमाशी, फुलकिडे, रसशोषक अळी इ. चा उपद्रव वाढल्याने पिक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.आंबा, सफेद जांभू या बागायती मोहर धरू लागल्या आहेत. तालुक्यात जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. सफेद जांभूचे क्षेत्र त्यामुळे पिकांवर औषध फवारणी करण्याची गरज आहे. मात्र शेतकऱ्याकडे तेवढा पैसा नसल्याने आकाशाकडे पहावे लागत आहे.मात्रच्डहाणू पंचायत समिती कृषी विभागाकडे ना औषधांना साठा आहे ना फवारणी साहीत्य त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी विक्रेत्यांकडून अधिक पैसे देऊन किटकनाशके खरेदी करावी लागतात. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासकीय अनास्थेपायी शेतकऱ्यांचा हकानाक बळी जात आहे. च्जिरायत, प्रवाही, ठिबक, तुषार आणि बांधावरील आंबा लागवडीचे एकूण क्षेत्र १७१९.४० हेक्टर आहे. झाडांनी मोहर धरल्याने आणि दुसरीकडे पालवी फुटल्याने बागायतदारांचे गणित बिघडले आहे.