शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कुर्बानीनंतर स्वच्छता होणार

By admin | Updated: September 13, 2016 02:18 IST

बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या कुर्बानीनंतर जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाणीच्या साफसफाईबाबत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेला

भिवंडी : बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या कुर्बानीनंतर जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाणीच्या साफसफाईबाबत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा महापौरांच्या मध्यस्थीनंतर मावळला. गेल्या तीन-चार दिवसांपासून मनपा प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये धुसफूस सुरू होती. या प्रकरणी सोमवारी दुपारी महापौर तुषार चौधरी यांनी कामगार संघटनांशी चर्चा केल्याने मंगळवारपासून बकरी ईदची सफाई करण्याची तयारी कामगारांनी दर्शवली. त्यामुळे ईदच्या आयोजनातील अडथळे दूर झाल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील शहर सफाई सोडता अन्य सर्व कामे ठेकेदारामार्फत करण्यात येतात. त्यामुळे बकरी ईदनिमित्ताने होणाऱ्या कुर्बानीनंतरचा जनावरांचा टाकाऊ भाग व इतर घाण वाहून नेण्यासाठी ठेकेदार नेमावेत, अशी मागणी कामगार संघटनेने प्रशासनाकडे गेली दोन वर्षे सुरू केली आहे. मात्र, प्रशासनाने विविध कारणे पुढे करीत कुर्बानीनंतरची स्वच्छता सफाई कामगारांकडूनच सुरू ठेवल्याचा आरोप करीत संघटनांनी प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. दैनंदिन सफाई ही सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी असून अत्यावश्यक सेवा म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, तर शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. कामगारांनी स्वच्छतेचे काम केले नाही, तर त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत फौजदारी कारवाई करण्याची नोटीस दिल्याने प्रशासन व कामगार संघटनांमध्ये तणावाचे वातावरण होते. ईदच्या सणात व्यत्यय येऊ नये, म्हणून महापौर तुषार चौधरी यांनी मध्यस्थी केली.कुर्बानी केंद्रावर व इतर ठिकाणी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम केल्यास दिलेली नोेटीस मागे घेण्यात येईल, असे पत्र कर्मचारी संघर्ष कृती समितीला दिले. त्यानंतर, कामगार व प्रशासनातील वातावरण निवळले आणि सफाईप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत कर्मचाऱ्यांनी बकरी ईदच्या काळात सफाईचे काम करण्याचे संघटनांनी मान्य केले. (प्रतिनिधी)