उल्हासनगर : शहरातील वुडलँड इमारतीत हलविण्यात आलेले शिक्षण मंडळाचे कार्यालय पुन्हा मुख्यालयात आणण्याची पक्रिया सुरू होताच सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कारभार पारदर्शक होण्यासाठी हे कार्यालय पालिका मुख्यालयात हलविण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. उल्हासनगर महापालिका मुख्यालयात हे कार्यालय असतांना मंडळात नगरसेवकांसह पालिका अधिकाऱ्यांची ऊठबस होती. त्यामुळे मंडळाच्या कारभारावर नियंत्रण राहत होते. मात्र, अपुऱ्या जागेमुळे शिक्षण मंडळ कार्यालय वुडलँडच्या तिसऱ्या माळ्यावर हलविल्यावर मंडळ नेहमी वादग्रस्त राहिले आहे. महिला छळवणुकीप्रकरणी तत्कालीन प्रशासन अधिकारी गायकवाड व बिडवे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. काही वर्षांत शिक्षण मंडळाची पत घसरली असून शाळेतील मुलांची संख्या १२ वरून ६ हजारांवर आली आहे. कारभार पारदर्शक होण्यासाठी व शाळांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी हे कार्यालय पालिका मुख्यालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होताच स्थानिक नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आला आहे.(प्रतिनिधी)
मनपा शिक्षण मंडळ कार्यालय हलविण्यावरून वाद
By admin | Updated: August 12, 2015 23:17 IST