शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या समस्यांचा जागीच निवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:45 IST

शहरविकास तसेच नागरिक व नगरसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी ‘आॅन दि स्पॉट’ उपक्रम सोमवारी सुरू केला. पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नगरसेवक व नागरिक आपल्या समस्या मांडत असून त्या सोडवण्याचा धडाका आायुक्तांनी लावला आहे

उल्हासनगर : शहरविकास तसेच नागरिक व नगरसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी ‘आॅन दि स्पॉट’ उपक्रम सोमवारी सुरू केला. पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नगरसेवक व नागरिक आपल्या समस्या मांडत असून त्या सोडवण्याचा धडाका आायुक्तांनी लावला आहे. त्यापैकी ५० टक्के तक्रारी बेकायदा बांधकामाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगर महापालिकेला शिस्त आणण्यासाठी आयुक्तांनी विविध उपक्रम सुरू केले. नगरसेवक उठसूठ केव्हाही आयुक्तांना भेटत असल्याने, त्याचा पालिका कामकाजावर परिणाम झाला. अखेर आयुक्तांनी नागरिक व नगरसेवकांनी फक्त सोमवारी भेटा, असे फर्मान काढले. याला सुरूवातीला विरोध झाला. मात्र नगरसेवकांनी नंतर सहकार्य करण्याचे ठरवले आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता पालिका आयुक्त सर्व विभागप्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन पालिका कामकाजाची माहिती घेतात. त्यानंतर नागरिक व नगरसेवकांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून घेतात. त्यानंतर संबंधित अधिकाºयांना बोलवून केव्हा सोडवणार याबाबत विचारणा करून आॅन दि स्पॉट निर्णय घेतला.आयुक्तांचा हा उपक्रम चर्चेचा विषय झाला असून नगरसेवकांसह पालिका अधिकारी यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. नगरसेवक, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी हे, आयुक्तांसमोर आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात आठवडयानंतर ती सोडवली जात नसल्याचे उघड झाले आहे. मात्र या उपक्रमासाठी संपूर्ण दिवस नागरिक, नगरसेवक, अधिकारी यांचा फुकट जातो. समस्या वेळेत सुटल्या नसल्यान त्याची यादीच दिवसेंदिवस मोठी होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप होत आहे.सोमवारच्या आयुक्तांच्या आॅन दि स्पॉट कार्यक्रमात नगरसेवकांसह नागरिकांच्या ५० टक्के तक्रारी बेकायदा बांधकामाबाबत आहे. यापुढे उपायुक्त संतोष दहेरकर हे बेकायदा बांधकामाच्या सुनावणी ऐकून घेऊन निर्णय घेतील, असे आयुक्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे निर्णय घेतले जाणार का याकडे लक्ष लागले आहे.बेकायदा बांधकामे सुरूचआयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त संतोष दहेरकर, प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम यांच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. महिन्याभरा पासून पाडकाम कारवाई नाही.