शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील दुगाड ग्रामपंचायत कार्यालयास नागरिकांनी ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या ११ लाख रुपयांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या ११ लाख रुपयांच्या निधींवर ग्रामसेविकेने डल्ला मारला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ग्रामसेविकेची चौकशी करून तिला निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दुगाड ग्रामपंचायत कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले.

दुगाड या ग्रामपंचायतीस १४ व्या वित्त आयोगातून सुमारे १४ लाख रुपये उपलब्ध झाले होते. ग्रामसेविका हर्षदा गुळवी यांनी आर्थिक वर्ष २०१९ - २०२० व २०२०-२०२१ या काळात लॉकडाऊनमुळे ग्रामसभा व ग्रामपंचायत मासिक सभा प्रत्यक्ष होत नसल्याचा फायदा घेत तब्बल ११ लाख ४ हजार २२० रुपयांचा निधी कार्यालयीन कागदपत्रात नोंद न करता खर्च केला आहे. ही बाब ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मांजरेकर यांनी उघडकीस आणली आहे. या गैरव्यवहारात ग्रामपंचायतीने दिलेल्या नोंदीनुसार अनेक देयके ही वैयक्तिक नावाने दिली असून, गावातील विहिरींमधील गाळ काढला नसतानादेखील त्यावर निधी खर्च केल्याचे नमूद आहे. कोविड काळात गावात आरोग्य सुरक्षाविषयक कोणत्याही उपाययोजना न करता फवारणी, कीटकनाशक फवारणी, कचरा एकत्रित करणारे डबे यावर लाखो रुपये खर्च केल्याची माहिती सदस्य प्रकाश मांजरेकर यांनी दिली आहे.

या आर्थिक गैरव्यवहारामधील एकही देयक धनादेशाद्वारे न देता रोखीने दिले. याबाबत ग्रामस्थांनी भिवंडी पंचायत समिती, जिल्हा परिषद ठाणे प्रशासनाकडे मार्च महिन्यापासून पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली. मात्र, ही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करून भ्रष्टाचाराची चौकशी करीत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे टाळे उघडणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

‘या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेविकेकडून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र, ग्रामसेविकेकडून कोणताही खुलासा आजपर्यंत पंचायत समिती कार्यालयास प्राप्त झालेला नाही’, अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे.