शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची पालिकेवर धडक

By admin | Updated: August 13, 2014 02:00 IST

पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

मुंबई : पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. मालाड पूर्वेकडील काही भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या उद्भवली असून त्याचा फटका ३० ते ३५ हजार नागरिकांना बसत आहे. याकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात पाणी टंचाई उद्भवल्याने पालिकेकडून पाणीकपात करण्यात आली होती. त्यानंतर आनंदवाडी, लक्ष्मण नगर, कोकणी पाडा, दत्तवाडी परिसरात काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याची, तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे टॅँकरचे पाणी वापरून दिवस काढत असल्याचे येथील त्रस्त नागरिक किरण बिडीये यांनी सांगितले. आमच्या लक्ष्मण नगरात जराही पाणी येत नसल्याने टॅँकरचे पाणी मागवावे लागत आहे. त्यात एकाच वेळी पाणी भरण्यासाठी सर्वांची झुंबड उडते. त्यामुळे बाजूच्या भागात जाऊन गढूळ पाणी आणावे लागत असल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. मुलांच्या आरोग्यावरही त्याचा मोठा दुष्परिणाम होत आहे, असे स्थानिक रहिवासी शीतल जैन यांनी सांगितले. नागरिकांना अनेक महिने पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पालिकेकडून दोन दिवसांत पाण्याचा दाब वाढवण्यात येणार असून पाणीकपात पूर्णपणे बंद करण्यात येण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. तसेच लक्ष्मण नगर येथे एक महिन्याच्या कालावधीत पाण्याची नवीन पाइपलाइन बसवण्याची हमी साहाय्यक पालिका आयुक्त देवेंद्र जैन यांनी या वेळी दिल्याचे नगरसेविका रूपाली रावराणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)