शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नियोजन नसल्यानेच शहरे झाली होती ठप्प

By संदीप प्रधान | Updated: August 25, 2025 11:34 IST

Thane Rain News: पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस असे उजाडतात की, शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस दोन-चार तासात झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहरे बुडतात आणि हतबल होतात. लोकांना घरी बसणे बंधनकारक केले जाते. रेल्वेसेवेचा बोजवारा उडतो.

- संदीप प्रधान(सहयाेगी संपादक)

पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस असे उजाडतात की, शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस दोन-चार तासात झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहरे बुडतात आणि हतबल होतात. लोकांना घरी बसणे बंधनकारक केले जाते. रेल्वेसेवेचा बोजवारा उडतो. वस्त्यांमध्ये पाणी शिरते व संसार उद्ध्वस्त होतात.  अस्मानीबरोबर हे सुलतानी संकटही आहे. शहरांचे नियोजन साफ कोलमडले आहे. सरकारी संस्थांमध्ये संवाद-समन्वयाचा अभाव आहे.

श्रावणात आषाढासारखा पाऊस सोमवार, मंगळवारी कोसळला. अर्थात दिवसभरात १०० मिमी. पाऊस होत असेल तर त्याला तोंड देण्याकरिता खरेतर आपण सज्ज असायला हवे. परंतु, या आघाडीवर आपली वाटचाल ही उलट दिशेने सुरू आहे. एकेकाळी ठाण्यात पावसाचे पाणी मुरण्याकरिता माती असलेली मोकळी जागा मुबलक होती. आता इंचन इंच जमीन सिमेंट काँक्रीटने बांधून काढण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ठाण्यात पुनर्विकासाला भरती आल्याने टॉवर उभे राहात आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचा त्रास होऊ नये, याकरिता रस्ते काँक्रिटीकरणाची मोहीम सुरू आहे. काही प्रमुख रस्ते काँक्रिटचे केले. तरीही ठाण्यातील खड्ड्यांचे ओंगळवाणे चित्र झाकणे शक्य झालेले नाही.

घोडबंदर रोड आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. त्यात दुचाकीस्वार जखमी झाले किंवा मरण पावले. घोडबंदर रोडच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तर दुसऱ्या बाजूला खाडी आहे. डोंगरातून येणारे पाणी येथे दुभाजक व अन्य बांधकामांमुळे अडते व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. घोडबंदर रोडवर मुख्य रस्ते व सेवा रस्ते एकमेकांना जोडण्यात येत आहेत. नव्या नाल्यांची कामे होण्यापूर्वीच काही नाले बुजवले.

ठाण्यातील घोडबंदर असो की, शिळफाटा सर्वत्र बिल्डरांचे प्रकल्प उभे राहात आहेत. अनेक बिल्डर आपल्या सोयीनुसार बांधकाम करतात. नाल्याचे प्रवाह वळवतात. लोक घरे घेतात व आपण किती पाण्यात आहोत, याचे पितळ अशा अतिवृष्टीच्या वेळी उघडे पडते. ठाणे व परिसरात मेट्रो, उड्डाणपूल, ठाणे-बोरिवली टनेल प्रकल्प, स्मार्ट सिटी असे असंख्य प्रकल्प सुरू आहेत. एमएमआरडीए काय करतेय ते महापालिकेला ठाऊक नाही आणि रस्ते विकास महामंडळाच्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. अंधेर नगरी चौपट राजा कारभार सुरू आहे.  माध्यमांनी कितीही बोंब मारली तरी आमचे काही बिघडत नाही. आम्ही आमच्या व्होटबँकेवर निवडून येतो. त्यामुळे आम्हाला कशाचे भय नाही, अशीच लोकप्रतिनिधींची भावना आहे.

मध्य रेल्वेची हतबलतामध्य रेल्वेची वाहतूक मुंबईच्या दिशेला मंगळवारी झाली नाही. रेल्वेने शटल सेवा चालवली. २६ जुलै २००५नंतर परवा तो प्रयोग केला.  प्रवासी संघटना शटल सेवा चालवण्याची मागणी करतात. मात्र, ठाणे स्थानकात लोकल उभी करून पुन्हा कल्याणला सोडण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मुंब्रा ते ठाणे अंतर कापायला दोन ते अडीच तास लागले. देशाच्या आर्थिक राजधानीलगतच्या शहरांत वाहतुकीची ही दारुण स्थिती आहे.

 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस