शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गटारसफाईसाठी बालकामगार जुंपले

By admin | Updated: May 23, 2017 01:32 IST

पावसाळ्याच्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना केडीएमसीने अद्याप जोर धरला नसताना सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामामध्ये मात्र कंत्राटदाराकडून

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पावसाळ्याच्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना केडीएमसीने अद्याप जोर धरला नसताना सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामामध्ये मात्र कंत्राटदाराकडून बालकामगारांचा वापर सुरू असल्याचे चित्र डोंबिवलीत पाहयला मिळत आहे. सफाईचे कंत्राट दिले की काम झाले या भूमिकेत असलेल्या केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे सफाईचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. केडीएमसीकडून दरवर्षी गटारे आणि नाल्यांची सफाई केली जाते. मात्र या सफाईवर सातत्याने टीका होत असते. पावसाळयापूर्वी, पावसाळयात आणि पावसाळयानंतर अशा तीन टप्प्यात ही कामे केली जातात. या कामांचे कंत्राट दिली जात असल्याने मे महिन्यापासूनच याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात होते. परंतु प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया उशिराने पार पडल्याने नालेसफाईच्या कामांना विलंबाने सुरूवात झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, याआधी छोट्या-मोठ्या गटारांच्या सफाईच्या कामांना प्रारंभ झाला असून ही कामे जोमाने सुरू आहेत. गटार सफाईच्या कामांसाठी मागील वर्षी १० प्रभागांमधील १२२ प्रभागांमध्ये २ कोटी ३३ लाख ७७ हजार ९८८ रूपये खर्ची झाले होते. विशेष बाब म्हणजे यंदाही एवढाच खर्च केला जाणार आहे. परंतु या कामांमध्ये बालकामगारांचा वापर केला जात असल्याने ही सफाईची कामे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. डोंबिवली पूर्वेकडील लोकमान्य टिळक रस्त्यावर हे चित्र सोमवारी दिसले. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील गटारांच्या सुरू असलेल्या सफाईच्या कामांमध्ये बालकामगारांचा सहभाग होता. डोंबिवलीचे मनसे शहरअध्यक्ष मनोज घरत यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. कसाऱ्याहून कंत्राटदाराने कामगार मागवले आहेत. यात अल्पवयीन मुले कामासाठी आली आहेत. अधिकाऱ्यांचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्या मुलांकडे विचारपूस केली असता दहावीचे शिक्षण नुकतेच झाल्याची माहिती त्यांनी दिल्याचे घरत यांनी सांगितले. कमी पैशात मजूर घ्यायचे आणि कंत्राटदाराने मोठया प्रमाणावर पैसे कमवायचे असा हा प्रकार सुरू असून याप्रकरणी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.