शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री करणार खोच गावाचा दौरा

By admin | Updated: September 13, 2016 02:03 IST

गेल्या महिन्यात १२ आणि या महिन्यात खोच ग्रामपंचायत मधील सागर वाघ, ईश्वर सवरा या दोन बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर आता खासदार वनगा

विक्रमगड : गेल्या महिन्यात १२ आणि या महिन्यात खोच ग्रामपंचायत मधील सागर वाघ, ईश्वर सवरा या दोन बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर आता खासदार वनगा यांनी या दोघांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी धाव घेतली असून मुख्यमंत्रीही या परिसराचा दौरा लवकरच करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. निष्पाप दोन बालकांचा एका आठवड्यात कुपोषणाने झालेला मृत्यू, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यानी त्याकडे फिरवलेली पाठ, या प्रश्नावर श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, बालमृत्यू, कुपोषण याचे लोकमतने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात हे घडले तरी त्यांनी या परिसरला भेट देण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. प्रशासनही मुर्दाडासारखे वागले. यामुळे संतप्त झालेल्या जनभावना ओळखून मुख्यमंत्री या परिसराचा दौरा करणार असल्याचे समजते.शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सभापती सारिका निकम व यांनी सागरच्या कुटुंबीयांना मदत केली तर ईश्वरच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले त्याचबरोबर पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा यांनीही सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अन्नधान्य आणि रोख रकमेची मदत केली असून मोखाडा रुग्णालयात बालरोगतज्ञ स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती लवकरच होणार असल्याचे लोकमतला सांगितले. या महिन्यात कुपोषणाचे दोन बळी गेल्यानंतरही या पालकमंत्री विष्णू सवरा आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत अजूनही फिरकलेले नाहीत. त्यामुळे येथील जनभावना संतप्त आहेत. (वार्ताहर)