शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

प्रशिक्षणाच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: January 9, 2017 07:31 IST

अनेक सुशिक्षित मुली स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गृहिणीही अशा प्रशिक्षणाकडे

बदलापूर : अनेक सुशिक्षित मुली स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गृहिणीही अशा प्रशिक्षणाकडे वळत असतात. हे प्रशिक्षण घेताना सरकार मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्राला पसंती दिली जाते. याचाच फायदा घेऊन बदलापुरात एका दाम्पत्याने १०० ते १५० महिला आणि तरु णींना व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. सानेवाडी परिसरात मार्चमध्ये सुनील घडवले व त्याची पत्नी सुप्रिया यांनी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. या केंद्राची जाहिरातबाजी केली होती. त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग, मोबाइल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, कॉम्प्युटर ट्रेनिंग, ज्वेलरी मेकिंग, ब्युटी पार्लर अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचा समावेश होता. हे फक्त महिलांसाठीच प्रशिक्षण असून केंद्र सरकार मान्यता प्राप्त असल्याचा दावा केला होता. मोफत शिका आणि पाच हजार प्रशिक्षण शुल्क मिळवा, अशी जाहिरात केली होती. त्याशिवाय, येथे प्रशिक्षण घेतलेल्या काही महिलांना येथेच नोकरीही दिली. त्यामुळे अनेक महिलांनी येथे प्रवेश घेतला. त्यांच्याकडून वेगळ्या प्रशिक्षणासाठी १ पासून ते ३२ हजारांपर्यंत रक्कम फी म्हणून घेतली. परंतु, २५ आॅक्टोबरला अचानक हे दाम्पत्य प्रशिक्षणासाठी जमा झालेले फीचे लाखो रु पये घेऊन पसार झाले. (प्रतिनिधी)