शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जकातनाक्यावर चार्जिंग स्टेशन

By admin | Updated: May 7, 2017 05:54 IST

ठाणे परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यांमुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे यावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यांमुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे यावर मात करण्यासाठी महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्या रस्त्यावर धावणार असल्या तरी पालिकेला कोणताही खर्च न करता, उलट महिनाकाठी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या बससाठी आवश्यक असणारे चर्जिंग स्टेशन आनंदनगर जकातनाक्यावर उभारण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, खऱ्या अर्थाने त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.परिवहनच्या ताफ्यात सध्या ३१३ बस असून प्रत्यक्षात १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात नव्याने घेण्यात येणाऱ्या १९० पैकी काही बस आता येत्या काही महिन्यांत दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना सध्या इतर सेवांवर अवलंबून राहावे लागते. ठाणेकरांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्या सेवेसाठी या सेमीलोअरफ्लोअर इलेक्ट्रिक हायब्रीड बस पालिका पीपीपी तत्त्वावर घेणार असून यात एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. त्यानुसार, १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून पहिल्या टप्प्यात १० बस घेतल्या जाणार आहेत. युरोपात ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस धावतात, त्यानुसार ठाण्यातही ही सेवा देण्याचा मानस एका कंपनीच्या मदतीने देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात ज्या १० बस येणार आहेत, त्या आनंदनगर ते घोडबंदर गायमुख या मार्गावर धावणार असून प्रवाशांना साध्या दरातच एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. भविष्यात बोरिवलीपर्यंतदेखील ही सेवा देण्यात येणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबंधित एजन्सी वायफाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर काहीही उपलब्ध करून देऊ शकते. त्याचे चार्जेस हे त्यांचे उत्पन्न असणार आहे. एजन्सीचेच कर्मचारीइलेक्ट्रिक बस खाजगी माध्यमातून घेतल्या जाणार असल्याने त्यावर चालक, वाहक, चार्जिंग आॅपरेटर हे संबंधित एजन्सीचे असणार आहेत. महापालिका केवळ त्यांच्यासाठी जागा देणार असून बसथांब्यावर चार्जिंग सेंटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आरटीआय नियमानुसार तिकिटाचे दर आकारण्यात येणार आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संबंधित ठेकेदार हा एका बसमागे महिनाकाठी १० हजार रुपये प्रशासनास देणार असल्याने १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न काही न करता मिळणार आहे.