शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

गाळात रुतलेली पालिका वर काढण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

By admin | Updated: May 29, 2017 06:12 IST

गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा गाडा स्वबळावर हाकण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेसकडील या महापालिकेला राजश्रय लाभणे कठीण आहे. अशा परिस्थितीत भिवंडीकरांच्या अपेक्षांना सार्थ ठरण्याची काँग्रेसची कसोटी आहे.मागील निवडणुकीत काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आलेले असतानादेखील कोणार्क आघाडी व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या तिजोरीत अक्षरश: खडखडाट आहे. कराची प्रचंड थकबाकी आहे. महापालिका ८०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. शहरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मालमत्ताकर हा पालिकेचा एकमेव प्रमुख उत्पन्नस्रोत आहे. मनपातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही वसुली न केल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान व निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.अशा स्थितीत महानगरपालिकेस आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.शहरात भाजपाचे खासदार, शिवसेना व भाजपाचे असे दोन आमदार असून भाजपाची सत्ता असल्यामुळे अपेक्षित अनुदान, निधी मिळताना कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर भरपूर निधी उपलब्ध करून देऊ. मात्र, तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती दिल्या, तर निधीची लूट करणाऱ्यांच्या खिशात तो जाऊ देणार नाही, असे स्पष्ट विधान फडणवीस यांनी जाहीर सभेत केले होते. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर महापौर बसवला व शहराचा विकास झाला नाही, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.देशात भाजपाला अनुकूल वातावरण असताना भिवंडीतील बहुसंख्य मुस्लिम समाजाने काँग्रेसची साथ देऊन नवे संकेत दिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे आकृष्ट झालेला मुस्लिम गोमांसबंदी व ट्रिपल तलाक अशा मुद्द्यांमुळे तसेच भाजपा-रा.स्व. संघाच्या बेलगाम नेत्यांच्या वक्तव्यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळला आहे, असे दिसत आहे.त्यामुळे पुन्हा धार्मिक राजकारणाची पोळी न पिकवता मुस्लिम समाजाचा विकास करून दाखवण्याचे व हाच भिवंडी पॅटर्न पुढील निवडणुकीत काँग्रेसला यश देईल, अशी बांधणी करावी लागेल, असे मुस्लिम समाजातील नेत्यांचेही मत आहे.