शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणातर्फे वनमहोत्सव साजरा

By admin | Updated: August 15, 2014 01:38 IST

सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मनोर : सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरात वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेची शाळा नूतन विद्यालय, बहाडोळी येथे हा मेळावा झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.वृक्षांचे महत्व राखतानाच पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावर व वरकस जमिनीत वृक्षलागवड करण्याचे आवाहन सामाजिक वनीकरणाचे पालघरचे लागवड अधिकारी रूचिता संखे यांनी केले, तसेच पंचायत समितीचे सदस्य सचिन पिंपळे यांनी शेतकऱ्यांना वृक्षामुळे होणारे फायदे व त्यांचे महत्व पटवून दिले. बहाडोळीचा जांभूळ जगभरामध्ये प्रसिध्द आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक वर्ष बहाडोळीच्या शेतकऱ्यांना जांभळाचे उत्पन्न दिड ते दोन लाख रूपये मिळते अशाप्रकारे दुसऱ्या फळांचीही लागवड करून एक प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या कार्यक्रमाला मुकेश शहा, मुख्याध्यापक मनोहर पाटील, सरपंच सुजाता बरफ, उपसरपंच मिनाताई पाटील, प्रफुल्ल घरत शिक्षक, अशोक पाटील तंटामुक्त अध्यक्ष, प्रमोद सीगते आदी उपस्थित होते.ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये निसर्गाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण, ठाणे व पालघर विभागातर्फे दिंडी काढून जनजागृती करीत आहे. यावेळी बहाडोळी येथील शाळकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ, महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)