शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

व्यंगचित्रांद्वारे दिला जातोय पाणी वाचवण्याचा संदेश

By admin | Updated: May 15, 2016 03:50 IST

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे

डोंबिवली : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे. त्याचा प्रारंभ शनिवारी झाला. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.गणेश जोशी यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इंदूर, दिल्ली येथील ५० व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्रात असाच भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख व व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळाची दाहकता दाखवणारे व्यंगचित्र रेखाटले होते. ते व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहता येईल. प्रदर्शनाच्या सुरुवातीस हे व्यंगचित्र मांडले आहे. त्याचबरोबर मंगेश तेंडुलकर, गणेश जोशी, प्रभाकर वाईरकर, व्ही.ए. हसबनीस, सुरेश सावंत, निलेश जाधव, श्रीनिवास प्रभुदेसाई, सुधाकर सोनी आदी प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय, लहानगे व्यंगचित्रकार प्रथमेश काटकर आणि श्वेता शेवाळे यांचीही व्यंगचित्रे आहेत. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत पाणी कसे वाचवता येईल, त्याचा गैरवापर कसा टाळता येईल, कूपनलिकांचा अतिवापर, चुकीची पीकपद्धती, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि सरकारी यंत्रणेतील त्रुटी अशा अनेक विषयांवर हलकेफुलके विनोदी मार्मिक भाष्य करणारी व्यंगचित्रे प्रदर्शनातून पाहता येतील.विविध विषयांवर दृष्टिक्षेपनिसर्गावर केली मात - यापुढे पाणीकपात, अपव्यय टाळा - पाणी वाचवा... असे संदेश या प्रदर्शनाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तंत्रज्ञान पुढे गेले असले तरी निसर्गनिर्मित पाणी संगणकावर डाऊनलोड करता येत नाही. यावरही, त्यात भाष्य करण्यात आले आहे. पैशांच्या बँका सुरू झाल्या, पण पाणीबँक ही संकल्पना आपल्याकडे रुजवली जात नाही. महिलांना मंदिर प्रवेशापेक्षा त्यांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. यावर, प्रदर्शनातील व्यंगचित्रे कटाक्ष टाकणारी आणि लक्षवेधी आहेत.