शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १९ अ ची पोटनिवडणूक १७ एप्रिलला

By admin | Updated: March 29, 2016 03:23 IST

प्रभाग क्र. १९ अ चे शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर या प्रभागात येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे देवराम

ठाणे : प्रभाग क्र. १९ अ चे शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर या प्रभागात येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना शिवसेनेकडून अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही. परंतु, शिवसेनेकडून दोघांनी अर्ज घेतल्याने त्यापैकी कोण उमेदवार निश्चित होणार, हे शेवटच्या म्हणजेच मंगळवारी निश्चित होणार आहे. माजिवडा प्रभाग १९ अ मधून शिवसेनेच्या तिकिटावर लॉरेन्स डिसोझा हे निवडून आले होते. त्यांनी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते देवराम भोईर यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर, डिसोझा यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवून ते सरकारजमा करण्याचे आदेश विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले होते. त्यानंतर, येत्या १७ एप्रिलला या प्रभागात पोटनिवडणूक होऊ घातली असून सोमवारी राष्ट्रवादीकडून देवराम भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, विरोधी पक्षनेते संजय भोईर, माजी महापौर अशोक राऊळ, नगरसेवक भय्यासाहेब इंदिसे, सुहास देसाई आदी उपस्थित होते. सेनेकडून माजी नगरसेवक रवींद्र पाटील आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे संघटक सचिव सुनील पाटील यांनी सोमवारी अर्ज तर नेले परंतु, यापैकी कोणाला संधी शिवसेना देणार, हे आता मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.अवघ्या सहा महिन्यांसाठी मिळणार नगरसेवकपद अवघ्या सहा महिन्यांसाठी हे नगरसेवकपद मिळणार असल्याने उमेदवार उभा करावा की नाही, याबाबत शिवसेनेमध्ये चाचपणी सुरू आहे. दोघांनी अर्ज जरी नेले असले तरी अवघ्या सहा महिन्यांवर सार्वत्रिक निवडणूक आल्याने आता उमेदवार कशाला उभा करायचा, अशी चर्चा सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना या पोटनिवडणुकीत माघार घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसे झाल्यास देवराम भोईर हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.