शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील हळदी समारंभात नाचविले बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही मंडळींना आरोग्य आणि सामाजिक भान नसल्याची बाब पुन्हा उघड झाली ...

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही मंडळींना आरोग्य आणि सामाजिक भान नसल्याची बाब पुन्हा उघड झाली आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावात एका हळदी समारंभात बैल नाचविण्यात आले. बैलांवर पैशांची उधळणही करण्यात आली. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. याबाबत गंभीर दखल महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चिंचपाडा येथे राहणारे प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दोन बैलांना नाचविण्यात आले. त्याठिकाणी डीजेही लावण्यात आला होता. या बैलांवर पैसेही उधळण्यात आले. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. हा प्रकार कळताच प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली हाेती. कोरोना रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेत संचारबंदी असताना एका बारमध्ये मद्यपान करीत असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कल्याण पूर्व भागात बाजारही भरला होता. त्यानंतर आज हळदी सभारंभात बैल नाचविण्याचा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी कोरोनाकाळात डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली परिसरातील एका तरुणाने बैलाचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एका माजी नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नसोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले होते. कोरोना वाढत असाताना अशा बेजबाबदार घटना घडत असल्याने कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे भय लोकप्रतिनिधींसह समान्य नागरिकांनाही राहिले नसल्याचे उघड हाेत आहे.

फोटो-कल्याण-बैल

---------------------