शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

‘बीएसयूपी’ही भ्रष्टाचाराचीच गटारगंगा

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत राहिला. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दाखल केलेल्या

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत राहिला. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून अनियमितता झाल्याचे चव्हाट्यावर आले असून या प्रकल्पाला घोटाळ्यांची किनार लाभल्याचेही स्पष्ट झाले आहे.शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच गरिबांना घरकुले मिळावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने बीएसयूपी योजना राबवली. केडीएमसी हद्दीत पहिल्या टप्प्यात १३ हजार घरे उभारली जाणार होती. आठ ठिकाणी प्रकल्पांचे कामही सुरू झाले होते. परंतु, सध्या डोंबिवलीतील आंबेडकरनगरचा प्रकल्प वगळता बहुतांश ठिकाणचे प्रकल्प पूर्णत्वाला आलेले नाहीत. जे पूर्णावस्थेत आहेत, त्या ठिकाणी कायदेशीर अडचणी आल्याने लाभार्थ्यांना घराचा ताबा देणे शक्य झालेले नाही. दरम्यान, केडीएमसीची बीएसयूपी योजना सुरुवातीपासूनच वादात सापडली. जागा ताब्यात नसताना नगररचना विभागाने बांधकामासाठी लागणारी आयओडी(परवानगी) देणे, प्रकल्पांच्या जागेचा एनए नसणे, वन विभागाच्या जागेवर प्रकल्पाचे काम सुरू करणे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगीनसणे, प्रकल्पातील अशा अनेक अनियमितता सुधाकर नांगनुरे समितीच्या अहवालात उघड झाल्या. तसेच ही घरे म्हणजे बेकायदा बांधकाम असल्याचा आरोपही केला गेला. योजना राबवण्याआधी लाभार्थ्यांची संख्या निश्चित असावी, असे बंधनकारक असूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचबरोबर घरांचे काम सुरू झाल्यावर पाच टक्के आगाऊ रक्कम देण्याचा नियम असताना महापालिका प्रशासनाने १० टक्के आगाऊ रकमेची खिरापत वाटली. लाभार्थी ठरवताना बोगस यादी तयार करून त्यांना घरभाड्याचा लाभ मिळवून दिल्याचा आरोपही करण्यात आला. चार जनहित याचिका : एकंदरीतच आढावा घेता या प्रकल्पाच्या अनियमिततेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल झाल्या. यात जागरूक नागरिक कौस्तुभ गोखले, माजी खासदार आनंद परांजपे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव आणि माजी नगरसेवक तात्या यांच्या याचिका आहेत. सखोल चौकशीची मागणीअनियमिततेप्रकरणी तत्कालीन आयुक्त, स्थायी समिती सभापती, सदस्य, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी आणि समंत्रक यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्याची मागणी माजी खासदार परांजपे यांनी केली होती. दरम्यान, शुक्रवारी अधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे हे हिमनगाचे टोक आहे. सखोल चौकशी केल्यानंतरच, यामागचे कर्तेकरविते समोर येतील, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे.