शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीत स्ट्राँगरूमबाहेर कारमध्येच होमहवन, युवक काँग्रेसच्या जागरूकतेमुळे पितळ उघडे, अधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:01 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत मतमोजणीच्या ठिकाणी बनवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे.

भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसकडून आक्षेप घेतले जात असतानाच, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत मतमोजणीच्या ठिकाणी बनवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पितळ उघडे पाडले.भिवंडी लोकसभेसाठी २९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा क्षेत्रांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये बनवलेल्या स्ट्राँगरूममध्ये सर्व ईव्हीएम सुरक्षित ठेवल्या. या ईव्हीएमच्या संरक्षणासाठी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि स्थानिक पोलीस असा त्रिस्तरीय जागता पहारा ठेवण्यात आला आहे. तेथील सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानेदेखील आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून बसविले आहेत. याच शाळेच्या दुसºया इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नाही. शाळेच्या कामानिमीत्ताने लोकांचे येथे मुक्त जाणेयेणे आहे. सोमवारी सायंकाळी शाळेचे चेअरमन महावीर जैन यांना भेटण्यासाठी आलेले श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार गेटमधून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या कारमध्येच होमहवनास सुरूवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांना समजली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली.बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली असता, पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यावेळी कारच्या मागील बाजूस होमहवनाची सामुग्री आढळून आली. त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन, तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का, असा प्रश्न त्यांना केला. कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो असता, माघारी जाताना सूर्यास्ताची वेळ झाल्याने कारमध्येच होमहवन केले. त्यामागे आपला कोणताही दुसरा हेतू नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी विनवणी केली असता, त्यांना सोडून देण्यात आले.स्ट्राँगरूमचा परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करीत पोलिसांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यवहार करण्यासाठी जाणाºयांनादेखील पायबंद घातला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे विजय पाटील यांनी केली आहे.शंभर मीटर परिसरात लावले सीसी कॅमेरेया घटनेच्या पार्श्वभूमिवर भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी स्ट्राँगरूम परिसरास तातडीने भेट दिली. या पथकाने परिसराची पाहणी करून तेथील ईव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावाही घेतला.यावेळी पत्रकारांशी बोलताना किसन जावळे यांनी होम हवनाचा प्रकार हा स्ट्राँगरूमपासून काही अंतरावरच झाल्याने गैरसमज निर्माण झाला होता. त्याबाबत शंका निरसन झाले आहे. स्ट्राँगरूम त्रिस्तरीय सुरक्षा कवच असून शंभर मीटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याद्वारे स्ट्राँँगरूमच्या ठिकाणी कडक पहारा आहे.दरम्यान, प्रेसिडेन्सी स्कूल व्यवस्थापनाने कार्यालयातील नियमीत कामकाजासाठी कर्मचारी शाळेत येणे आवश्यक आहेत, असे सांगितले. त्यावरून माळी, कामगार, शिपाई व कार्यालयीन कर्मचाºयांची नावे मागवण्यात आली असून त्यांच्या प्रवेशपत्राबाबत जिल्हाधिकाºयांकडे शिफारसही करण्यात आली आहे. त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandi-pcभिवंडी