शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दारु मागितली म्हणून भावांनी केली हत्या

By admin | Updated: May 22, 2017 01:57 IST

पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आ

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गेली सात-आठ वर्षे मोलमजुरी करणारे नाका कामगार अशोक चौरसिया व कमलेश चौरसिया (दोघेही मूळ रा. आजमगढ, उत्तर प्रदेश), राजन अभिमान मेश्राम (३५, मूळ रा. अमरावती) व बिरजू हे चौघेही मित्र. दिवसभर मिळेल ते काम करायचे; पण रात्रीच्या वेळी मात्र मिळून दारु प्यायची, असा त्यांचा नित्यक्रम. मीरा रोडच्या शीतल नगरमधील गणपती मंदिराजवळील मैदानात अशोक, कमलेश व राजन हे तिघे शनिवारी रात्री दारु पीत बसले होते. काही वेळाने बिरजू आला व त्याने अशोककडे दारु मागितली. त्याने पुन्हा दारु मागताच बाचाबाची सुरु झाली. त्यात कमलेशने बिरजूच्या कानाखाली लगावल्याने राजन त्या भांडमात पडला. अशोकने राजनला शिवीगाळ सुरु केली. त्याला राजनने विरोध केला. त्याचा राग येऊन अशोकने जवळ पडलेला लाकडी वासा घेऊन राजनच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केला. कमलेशनेसुध्दा तोच वासा घेऊन राजनवर हल्ला केला. बिरजू सोडवायला मध्ये पडला असता त्याच्या चेहऱ्यावर वासा घेत फटका लगावला. राजन व बिरजू रक्ताच्या थारोळ्यात पडताच अशोक तेथून पळून गेला, तर कमलेश परिसरातच घुटमळत थांबला. मीरा रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक महेश कुचेकर व पोलिस कर्मचारी विजय ब्राह्मणे घटनास्थळी पोहचले. एका साक्षीदाराकडून माहिती मिळताच आजूबाजूला घुटमळत असलेल्या कमलेशला पोलिसांनी अटक केली. तर ते अशोकचा शोध घेत आहेत.