शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दारु मागितली म्हणून भावांनी केली हत्या

By admin | Updated: May 23, 2017 01:21 IST

पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : पुन्हा दारु मागितली म्हणून झालेल्या वादात दोघा भावांनी एका मित्राची हत्या केली, तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गेली सात-आठ वर्षे मोलमजुरी करणारे नाका कामगार अशोक चौरसिया व कमलेश चौरसिया (दोघेही मूळ रा. आजमगढ, उत्तर प्रदेश), राजन अभिमान मेश्राम (३५, मूळ रा. अमरावती) व बिरजू हे चौघेही मित्र. दिवसभर मिळेल ते काम करायचे; पण रात्रीच्या वेळी मात्र मिळून दारु प्यायची, असा त्यांचा नित्यक्रम. मीरा रोडच्या शीतल नगरमधील गणपती मंदिराजवळील मैदानात अशोक, कमलेश व राजन हे तिघे शनिवारी रात्री दारु पीत बसले होते. काही वेळाने बिरजू आला व त्याने अशोककडे दारु मागितली. त्याने पुन्हा दारु मागताच बाचाबाची सुरु झाली. त्यात कमलेशने बिरजूच्या कानाखाली लगावल्याने राजन त्या भांडणात पडला. अशोकने राजनला शिवीगाळ सुरु केली. त्याला राजनने विरोध केला. त्याचा राग येऊन अशोकने जवळ पडलेला लाकडी वासा घेऊन राजनच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केला. कमलेशनेसुध्दा तोच वासा घेऊन राजनवर हल्ला केला. बिरजू सोडवायला मध्ये पडला असता त्याच्या चेहऱ्यावर फटका लगावला. राजन व बिरजू रक्ताच्या थारोळ्यात पडताच अशोक तेथून पळून गेला, तर कमलेश परिसरातच घुटमळत थांबला. मीरा रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक महेश कुचेकर व पोलिस कर्मचारी विजय ब्राह्मणे घटनास्थळी पोहचले. एका साक्षीदाराकडून माहिती मिळताच आजूबाजूला घुटमळत असलेल्या कमलेशला पोलिसांनी अटक केली. तर ते अशोकचा शोध घेत आहेत.