शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: June 16, 2015 03:18 IST

दीड वर्ष रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. परंतु, त्यात सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.

ठाणे : दीड वर्ष रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. परंतु, त्यात सदस्य म्हणून जाण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. विशेष म्हणजे यात डावललेल्यांची आणि नाराजांची संख्या अधिक आहे. त्यातही या समितीत १२ सदस्य जाणार असल्याने ९ सदस्यांची निवड ही संख्याबळानुसार सुरळीतपणे पार पडणार आहे. उर्वरित ३ जागांसाठी भाजपा, मनसे आणि इतर घटक पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, यातून कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या निवडणुकीसाठी १७ जून रोजी अर्ज भरले जाणार आहेत. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचा १ सदस्य परिवहनमध्ये जाणार आहे. परंतु, शिवसेनेतील ५ जागांसाठी अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चा वळविला आहे. यामध्ये नगरसेवक, स्वीकृत, वृक्ष प्राधिकरण, शिक्षण मंडळ आदींमध्ये आश्वासन देऊनही संधी न मिळालेल्यांची संख्या अधिक आहे. केवळ पाचच सदस्यांना संधी मिळणार असल्याने पुन्हा अनेक पदाधिकारी नाराज होणार आहेत. हीच परिस्थिती राष्ट्रवादीचीसुद्धा आहे. त्यांचे ३ सदस्य निवडून जाणार असले तरी आतापर्यंत २४हून अधिक जणांनी यासाठी भाऊगर्दी केली आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न श्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे. काँग्रेसही याबाबतीत पिछाडीवर नसून त्यांचा केवळ १ सदस्य परिवहनमध्ये निवडून जाणार आहे. मात्र, त्यांच्याकडेसुद्धा २२ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लावायची, हा पेच निर्माण झाला आहे. एकूणच तिन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने सर्वांनाच संधी देणे शक्य नसल्याने पुन्हा नाराजांची फळी उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे परिवहननंतर आता एकही समिती अथवा पालिकेत शिरण्याचा अन्य एकही मार्ग नसल्याने या नाराजांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा पेचही या पक्षांपुढे निर्माण झाला आहे.