शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसौष्ठवाचा मानकरी त्रिपाठी

By admin | Updated: February 21, 2017 05:39 IST

मीरा-भार्इंदर महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी मानकरी ठरला. क्रिकेटमध्ये

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी मानकरी ठरला. क्रिकेटमध्ये पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार संघाने पालिकेच्या कंत्राटी परिवहन संघाला पराभूत करुन विजय संपादन केला. या स्पर्धेची सांगता शनिवारी झाली. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते. स्पर्धा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत्या. स्पर्धेच्या सुरुवातीलाच सूर्यकुंभाचे आयोजन करुन त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. नंतर इतर स्पर्धांना सुरुवात झाली. लंगडी, धावणे, रिले, फुटबॉल, कॅरम, थाळी व गोळाफेक, कुस्ती, कबड्डी, खो-खो. क्रिकेट यांचा त्यात समावेश होता. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक व समूह नृत्य, चित्रकला आदी स्पर्धांचाही समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांसोबत यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिक व महिलांना संधी देण्यात आली. शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात साई अ‍ॅक्टिव्हचा शशिकांत गुडे, ६० किलो वजनी गटात गोल्ड कॉईनचा अंकुर निजाई, ६५ किलो वजनी गटात श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी, ७० किलो वजनी गटात फिनिक्स जिमचा विनायक लोखंडे, ७५ किलो वजनी गटात पावर झोनचा प्रेम राठोड, ८० किलो वजनी गटात साई अक्टिव्हचा संदेश मोहिते, ८५ किलो वजनी गटात पॉवर नाईनच्या आशिष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यातील शिवआसरे त्रिपाठीने महापौर चषकाच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकाविले. बेस्ट पोझरसाठी पार पडलेल्या अंतिम फेरीत विनायक लोखंडे सरस ठरला. क्रिकेटमध्ये पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार संघाने दमदार खेळी करुन महापौर चषक खेचून आणला. पालिकेच्या कंत्राटी परिवहन सेवेच्या संघाला ९ धावांनी पराभूत केले. विजेत्यांना महापौर जैन यांच्या हस्ते गौरविले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व पदके प्रदान केली. यावेळी विजेत्यांना व्यक्तिगत रोख रकमांची पारितोषिके प्रदान करणारी ही एकमेव मनपा असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)