शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फुलवतात सांजवात

By admin | Updated: October 30, 2016 02:36 IST

प्रत्येक जण दिवाळी आपल्या घरच्यांसोबत, मित्रांसोबत साजरी करतात. या दिवाळसणात मनासारखा खर्च करून धम्माल-मस्ती सुरू असते. परंतु, काही जण असेही आहेत,

- अजित मांडके, ठाणेप्रत्येक जण दिवाळी आपल्या घरच्यांसोबत, मित्रांसोबत साजरी करतात. या दिवाळसणात मनासारखा खर्च करून धम्माल-मस्ती सुरू असते. परंतु, काही जण असेही आहेत, जे दिवाळी काहीशा वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. त्यातील एक म्हणजे ठाण्यातील सरस्वती नॅशनल फाउंडेशन ही संस्था. या संस्थेतील पदाधिकारी गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमांत जाऊन वृद्धांबरोबर अनोखी दिवाळी साजरी करीत आहेत. दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी... असे म्हणत प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. परंतु, या पलीकडेही जाऊन काही जण ती वेगळ्या पद्धतीने साजरी करत असतात. ठाण्यातील सरस्वती नॅशनल फाउंडेशन हीदेखील त्यातीलच एक संस्था. ती गेल्या १० वर्षांपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वृद्धांसोबत दिवाळी साजरी करते. या संस्थेची मुहूर्तमेढ २००७ मध्ये रोवली गेली. परंतु, तिचे रजिस्ट्रेशन २०११ मध्ये झाले. मात्र, या संस्थेचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत असलेल्या वृद्धाश्रमांत जाऊन ही संस्था तेथील वृद्धांसोबत दिवाळी साजरी करते. दिवाळी आपण घरच्यांबरोबर साजरी करतो. परंतु, वृद्धांसोबत ती साजरी करण्यात काही औरच आहे. केवळ दिवाळी त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणे एवढाच यामागचा उद्देश नसून तेथील वृद्धांच्या व्यथा जाणून घेणे, त्यांना काही क्षण का होईना, थोडा आधार देणे, त्यांच्याबरोबर विविध स्वरूपांचे खेळ खेळणे, फराळाबरोबर काही भेटवस्तू देणे, अशा पद्धतीने आम्ही कित्येक वर्षे दिवाळी साजरी करत असल्याची भावना फाउंडेशनचे पदाधिकारी सुरेश माने यांनी व्यक्त केली. अशी दिवाळी साजरी करण्यासाठी कोणाकडूनही वर्गणी अथवा रक्कम गोळा न करता फाउंडेशनचे पदाधिकारी आपापल्या परीने मदत करतात. त्याचाही वेगळाच आनंद पदाधिकाऱ्यांनासुद्धा मिळतो. सध्या फाउंडेशनमध्ये आठ पदाधिकारी असून ३५ च्या आसपास सभासद आहेत. परंतु, प्रत्येक जण काहीना काही मदत करीत असतोच. त्यामुळेच आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकलो आहोत, असेही माने सांगतात. अनाथाश्रमात होळीकेवळ दिवाळी सणच नाही, तर मुलांच्या अनाथाश्रमातही होळीचा सण साजरा करण्याचे काम या फाउंडेशनतर्फे सुरू आहे. मागील वर्षी येथील येऊरच्या आश्रमात मुलांबरोबर होळी साजरी करताना त्यांना खाद्यपदार्थ देणे, होळीची मजा लुटणे आदी उपक्रम पार पडले.