शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

दहीहंडीच्या पंढरीत गोविंदांमध्ये निरुत्साह

By admin | Updated: August 17, 2016 02:53 IST

दहीहंडी जागतिक स्तरावर नेली, ती ठाण्याने. मग, ठाण्यातील आयोजक, त्यांचा इव्हेंट, बक्षिसांपासून ते गोविंदा पथकांचा सहभाग, उत्साह कायम चर्चेचा विषय ठरला आहे

स्नेहा पावसकर , ठाणे दहीहंडी जागतिक स्तरावर नेली, ती ठाण्याने. मग, ठाण्यातील आयोजक, त्यांचा इव्हेंट, बक्षिसांपासून ते गोविंदा पथकांचा सहभाग, उत्साह कायम चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, यंदा थर आणि बालगोविंदांच्या वयोमर्यादेबाबत लांबलेले निर्णय यामुळे दहीहंडीची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील गोविंदांमध्ये निरुत्साह दिसतो आहे. तर, आठ दिवसांवर दहीहंडीचा उत्सव येऊन ठेपला असतानाही पथकांचा सरावही अभावानेच पाहायला मिळतो आहे.गुरुपौर्णिमा झाली की, साधारण गोविंदा पथकांचा सराव ठिकठिकाणी सुरू होतो. ठाण्यात साधारण महिला आणि पुरुष दोन्ही मिळून ७० ते ८० गोविंदा पथके आहेत. त्या सर्वांचा सराव तर गुरुपौर्णिमेनंतर जोर धरतो. रात्री ९ नंतर परिसरातील जवळच्या मैदानात सराव रंगतात. मात्र, या वर्षी काही मोजकी गोविंदा पथके सोडली, तर अनेकांनी सरावाला सुरुवातच केलेली नाही. थरांची मर्यादा आणि १२ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाबाबत अनेक दिवसांपासून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे किती वर्षांपासूनच्या गोविंदांना सहभागी होऊ द्यायचे किंवा थरांबाबत कोणत्या आधारावर सराव करावा, असा प्रश्न गोविंदा पथकांसमोर आहे. त्यामुळे अनेकांनी सराव करणेच टाळले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत असल्याने गोविंदांमध्ये निरुत्साह आहे.