शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

इंडो अमाइन कंपनीत स्फोटासारखा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:48 IST

सागाव येथील इंडो अमाइन्स कंपनीच्या आवारातील २०० लीटर क्षमतेच्या आॅक्सिक्लोराइड केमिकलच्या रिकाम्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास स्फोटासारखा जोरदार आवाज झाला.

डोंबिवली : सागाव येथील इंडो अमाइन्स कंपनीच्या आवारातील २०० लीटर क्षमतेच्या आॅक्सिक्लोराइड केमिकलच्या रिकाम्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास स्फोटासारखा जोरदार आवाज झाला. मात्र, या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचा दावा कंपनीने केला. प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीत अफवांना अक्षरश: ऊत आला.डोंबिवली औद्योगिक फेज-२ मधील कंपनीत ही घटना घडली, तेव्हा दिवस आणि जनरल पाळीचे मिळून १५ कामगार कामावर हजर होते. दोन कामगारांनी फॉस्फरस आॅक्सिक्लोराइडचा ड्रम उघडण्याचा प्रयत्न केला असता उच्च दाबामुळे त्याचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या स्फोटामुळे कंपनीतील कामगार भीतीने बाहेर पळाले. कंपनी प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले की, ड्रममध्ये हवा पकडल्याने त्याचे झाकण उडाले आणि त्यामुळे आवाज झाला. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले होते.दरम्यान, फॉस्फरस आॅक्सिक्लोराइड या केमिकलचा ड्रम उडून भिंतीवर आपटल्याच्या वृत्ताला इंडस्ट्रियल सेफ्टी अधिकाºयांनी दुजोरा दिला. या प्रकरणाची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलातील उच्चपदस्थ अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या अपघाताच्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाºयांनी पाहणी केली असता २०० लीटरचा केमिकलचा रिकामा ड्रम होता. त्यात पावसाचे पाणी गेल्याने त्यामधील प्रेशर वाढल्याने स्फोट झाला.यासंदर्भात इंडस्ट्रियल सेफ्टी विभागाच्या घटनास्थळाला भेट दिलेल्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केमिकल कंपनीत पीओसीएल (फॉस्फरस आॅक्सिक्लोराइड) असलेला ड्रम उघडत असताना उच्च दाबामुळे ड्रम आणि त्याचे झाकण उडाले आणि ते कंपनीतच एका बीमवर आदळल्याने आवाज झाला. घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात इंडस्ट्रियल सेफ्टी विभागाच्या सहसंचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही चौकशीसाठी अधिकाºयांना पाठवले असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती देता येईल.