शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सूचनापेट्या काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:39 IST

मीरा रोड : ‘मेरा शहर मेरा सुझाव’ या निवडणूक प्रचारासाठी भाजपाने भार्इंदर रेल्वे स्थानकात बेकायदा लावलेल्या सूचनापेट्या रेल्वे सुरक्षा दलाने काढून टाकल्या. बेकायदा पेट्या लावण्याह रेल्वेच्या आवारात आचारसंहिता काळात परवानगी न घेताच केलेल्या प्रचार प्रकरणी रेल्वे प्रशासन व आचारसंहिता पथकने फौजदारी कारवाईची मागणी सत्यकाम फाउंडेशनने केली आहे. त्यामुळे शहरभर भाजपाने ...

मीरा रोड : ‘मेरा शहर मेरा सुझाव’ या निवडणूक प्रचारासाठी भाजपाने भार्इंदर रेल्वे स्थानकात बेकायदा लावलेल्या सूचनापेट्या रेल्वे सुरक्षा दलाने काढून टाकल्या. बेकायदा पेट्या लावण्याह रेल्वेच्या आवारात आचारसंहिता काळात परवानगी न घेताच केलेल्या प्रचार प्रकरणी रेल्वे प्रशासन व आचारसंहिता पथकने फौजदारी कारवाईची मागणी सत्यकाम फाउंडेशनने केली आहे. त्यामुळे शहरभर भाजपाने लावलेल्या सूचनापेट्या व त्या ठेऊन चाललेल्या प्रचाराबाबत पालिका व आचारसंहिता पथक पुन्हा संशयाच्या भोवºयात सापडले आहे.रेल्वे स्थानक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता, नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सूचना पेट्या ठेऊन प्रचार करत आहेत. अनेक दुकाने, हातगाड्या, सोसायटीच्या ठिकाणीही सूचना पेट्या ठेवल्या आहेत. शहरात पाच हजार सूचना पेट्या ठेवल्याचे स्वत: मेहतांनीच पत्रकार परिषदेत म्हटले होते. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या जिन्यावर भाजपाने सूचनापेटी लावली होती. त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री व आमदारांचे छायाचित्र असून निवडणूक चिन्ह आहेत.सत्यकाम फाउंडेशनचे प्रमुख कृष्णा गुप्ता यांनी याबाबत भार्इंदर रेल्वे स्थानकात आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेचच रेल्वे सुरक्षा दलाने भाजपाची सूचनापेटी काढून जप्त केली. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी गुप्ता याने केली आहे.

  • वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही

भार्इंदर रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयाशी संपर्क साधला असता जिन्यावर लावलेली बेकायदा पेटी काढून टाकण्यात आली असल्याचे सांगितले. पुढील कारवाईबाबत वरिष्ठांकडून आदेश येतील त्यानुसार कार्यवाही करू असे सांगण्यात आले.