शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांचा धुडगूस

By admin | Updated: July 12, 2016 02:38 IST

भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध तक्रारी करणाऱ्या तक्रारदाराच्या इमारतीत घुसून पोलिसांसमोर धुडगूस घालण्याचा प्रकार मेहतांच्या उपस्थितीत भाजपाच्या २००

मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध तक्रारी करणाऱ्या तक्रारदाराच्या इमारतीत घुसून पोलिसांसमोर धुडगूस घालण्याचा प्रकार मेहतांच्या उपस्थितीत भाजपाच्या २०० कार्यकर्त्यांनी मीरा रोड भागात केला. तक्रारदाराच्या घरात घुसून काहींनी त्यांना मारहाण केली. मेहतांविरोधात सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा प्रकार घडला. मेहतांच्या तक्रारीवरून तक्रारदारास खंडणीची मागणी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, दहशत पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करता उलट तक्रारदारालाच आरोपी केल्याचा आरोप विविध संघटनांनी केला. मीरा रोडच्या कनकिया येथील लक्ष्मी पॅराडाइजमध्ये राहणारे राजू गोयल यांनी आमदार मेहताविरोधांत तक्रारी केल्या आहेत. त्यावरून चौकशी सुरू आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. रविवारी रात्री सजी आयपी यांनी मेहतांच्या समर्थनार्थ टाकलेल्या फोटोंवर गोयल यांनी मेहतांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे स्वत: आमदार मेहतांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मीरा रोड पोलीस ठाण्याबाहेर जमले. दरम्यान, दोघे जण त्यांच्या घरी गेले. गोयल यांनी दार उघडताच त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. गोयल व त्यांच्या पत्नीने दार लावले व पोलिसांना कळवले. मेहतांसह जमाव इमारतीत शिरला. पोलिसांनी जमावाला वर जाण्यापासून रोखल्याने धुडगूस घातला. गोयल यांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर मेहता यांनी ठाण मांडले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. मेहतांच्या तक्रारीनुसार गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावली.