शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

By admin | Updated: February 13, 2017 05:01 IST

युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येती

ठाणे : युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येतील, असे विकासाचे मुद्देही नव्हते. त्यामुळे कोणत्या आधारावर आपली ताकद वाढवायची, असा पेच होता. परंतु, ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे, दलालांचे कंबरडे मोडणारे, रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावत शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि अनेक नवीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची प्रतिमा आणि त्यांचे काम हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत भाजपाने त्याचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली. वस्तुत:, प्रशासकीय अधिकारी असल्याने पक्षातीत असलेला हा चेहरा भाजपाने आपल्या प्रचारात आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्याच्या भाषणात त्यांच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या कामाला पसंतीची पावती दिली. तसेच भाजपाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही जयस्वाल यांच्या कामांचा उल्लेख करत त्यावर पसंतीची मोहोर उमटवली. बकाल होत असलेल्या ठाण्याला दिशा देण्यासाठी, नागरी प्रश्न, अनधिकृत बांधकामे, रस्त्यालगतची बांधकामे, वाहतूककोंडी फोडणे आणि स्मार्ट ठाण्यासाठी अनेक नव्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज होती. आयुक्तपदी येताच धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. स्टेशन रोड ते जांभळीनाका, पोखरण एक-दोन, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, घोडबंदर सर्व्हिस रोड, बाळकुम सर्व्हिस रोड, कळवा, मुंब्रा येथील अरुंद रस्ते मोठे केले. ती करताना रस्ते, फुटपाथ अडवणारे गॅरेजवाले, बार, लेडिज बार यांच्यावर कारवाई केली. पारसिकचा खाडीकिनारा मोकळा केला. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. यावर न थांबता विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वायफाय सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध योजना, हायटेक शिक्षण प्रणाली, नगरसेवकांची मोडून काढलेली दहशत आणि बाधितांचे पुनर्वसन यामुळे जयस्वाल सामान्यांच्या गळ्यातील ताईतच बनले. अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान, ब्रँडिंग ठाणे, ठाण्याला वेगळी ओळख, भिंती रंगवा अभियानामुळे शहर सुधारू लागले.(प्रतिनिधी)