शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजपाला हवा सत्तेत सहभाग

By admin | Updated: May 23, 2016 02:30 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी भाजपा सौदेबाजीवर उतरली आहे. बदलापूरमध्ये युतीचा धर्म पाळा, असा संदेश देत भाजपाने सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे

बदलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी भाजपा सौदेबाजीवर उतरली आहे. बदलापूरमध्ये युतीचा धर्म पाळा, असा संदेश देत भाजपाने सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. सत्तेत सहभागी न केल्यास भाजपाने अप्रत्यक्ष बंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सत्तेतील सहभागाचा निर्णय हा पालकमंत्र्यांमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे. बदलापूरमधील भाजपा नेते पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी आतुर झाले आहेत.विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी पालकमंत्री यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजयासाठी आकडेवारी अनुकूल असली तरी भाजपाकडून दगाफटका होण्याची भीती सेनेला आहे. भाजपाने मते फिरवल्यास त्याचा सरळ फटका हा शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे भाजपाच्या अपेक्षांकडे शिवसेना ‘अर्थपूर्ण’ लक्ष देत आहे. एवढेच नव्हे तर बदलापूरमध्ये भाजपाने थेट सत्तेत वाटा देण्याची मागणी करून सेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपाचे २० नगरसेवक असल्याने ही मते फुटू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.बदलापूर पालिकेच्या विषय समितीची निवडणूक मंगळवारी असल्याने या निवडणुकीच्या आधी सत्तेतील सहभागावर निर्णय होणे अपेक्षित धरण्यात आले आहे. भाजपाच्या वतीने गटनेते राजन घोरपडे हे स्थानिक पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करत आहेत. त्यानंतर, यासंदर्भातील अंतिम निर्णय हे पालकमंत्री शिंदे घेणार आहेत. मात्र, शिंदे यासंदर्भात बैठकीचे आयोजन कधी करणार, याकडे बदलापुरातील नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सत्तेचा वाटा देताना भाजपाने उपनगराध्यक्षपदासह दोन समित्यांची मागणी केली आहे. या मागणीबाबत सेना काय विचार करेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सत्तेत सहभाग देण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त बदलापुरातील भाजपाला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)