शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक प्रशांत केळुसकर फरार

By admin | Updated: August 21, 2016 01:37 IST

भार्इंदर पूर्वेला एका सदनिकेत चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर उत्तन पोलिसांनी छापा टाकून सदनिकामालकासह १२ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यावेळी जुगार खेळणारा भाजपा

मीरा रोड : भार्इंदर पूर्वेला एका सदनिकेत चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर उत्तन पोलिसांनी छापा टाकून सदनिकामालकासह १२ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यावेळी जुगार खेळणारा भाजपा आमदारांचा निकटवर्तीय नगरसेवक प्रशांत नारायण केळुस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रलोक फेज-६ च्या मयूरा पॅलेस इमारतीमध्ये १०१ क्रमांकाच्या सदनिकेत जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यापर्यंत गेल्या होत्या. पाटील यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरोजना मोकलीकर यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मोकलीकर यांच्यासह अशोक पालवे, युवराज पाटील, अहिरे, निलंगे या पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सदनिकेवर धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच जुगार खेळणाऱ्यांची भंबेरी उडाली. पोलिसांच्या भीतीने जुगार खेळणारा भाजपाचा भार्इंदर पूर्वेतील नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती प्रशांत केळुस्कर हा पळून गेला. केळुस्कर हा आमदार नरेंद्र मेहतांचा विश्वासू म्हणून ओळखला जातो. तर, पोलिसांनी सदनिकेचा मालक रितेश नारायण चौरसियासह चारुदत्त आयतोडा, चिराग मेहता, जिग्नेश चोपडा, नीरज ओथिवाल, जयंत सिंह, जयेश गोयल, मोहम्मद हुसेन, युनुस नडाफ, मोहम्मद इस्लाम, दाराब सिद्दीकी, समीर शेख या १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते व २८ हजार रोख जप्त केले आहेत. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शाळेतील गटारीनंतर आता जुगारी जुगार खेळणारा भाजपा नगरसेवक प्रशांत केळुस्कर याच्याविरोधात पोलिसांनीच फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला असला, तरी तो पळून गेला आहे. काही दिवसांपूर्वीच माशाचा पाडा महापालिका शाळेच्या आवारात गटारीची पार्टी केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक अनिल भोसले याच्याविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भोसलेला तर भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भोसलेपाठोपाठ आता जुगारावरून केळुस्करदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.