शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेविकेची शिवसेना महिला पदाधिकाऱ्यास शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस मुर्धा रेव आगर भागात महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कीटकनाशक फवारणीच्या श्रेयवादातून भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने ...

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस मुर्धा रेव आगर भागात महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कीटकनाशक फवारणीच्या श्रेयवादातून भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने शिवसेना महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांना अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

राई गावात राहणाऱ्या शिवसेना महिला उपशहर संघटक पाटील यांनी पावसाळा सुरू झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने राई, मुर्धा, मोरवा भागात कीटकनाशक फवारणी करण्याची विनंती पत्राद्वारे महापालिकेसह आमदार गीता जैन यांना केली होती.

शुक्रवारी मुर्धा रेव आगर झोपडपट्टीत पालिकेने कीटकनाशक फवारणी सुरू केली असता तेजस्वी उपस्थित होत्या. सदर प्रकार नगरसेविका नयना यांना कळताच त्यांनी जोरदार भांडण करत तेजस्वी यांना अश्लील अपशब्द वापरत शिवीगाळ केली. मी इकडची नगरसेविका आहे, तुझे इथे काय काम आदी मोठ्याने आरडाओरडा करत विचारणा केली.

तोच शनिवारी राई गावात कीटकनाशके फवारणीच्या कामाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर लाइव्ह केला म्हणून स्थानिक भाजप नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी तेजस्वी यांना जाब विचारला. त्यावेळी सुद्धा विनोद व तेजस्वी यांच्यात थेट फेसबुकवर लाइव्ह वादंग झाल्याने त्याबाबत चर्चा रंगली.

...............