शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत राजकीय बंड

By admin | Updated: May 5, 2017 06:03 IST

अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने आणि राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटण्यास तयार नसल्याने सर्व पक्षांतील उमेदवारांतील

भिवंडी : अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने आणि राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटण्यास तयार नसल्याने सर्व पक्षांतील उमेदवारांतील अस्वस्थता वाढली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्यास वेळ लागत असल्याने घालमेल सुरू झाल्याने असंतोष उफाळल्याने भिवंडीत विविध पक्षात बंडाचे निशाण फडकावले गेले आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत अनेक नाराज अर्ज भरतील, अशी स्थिती आहे. भाजपा, शिवसेना, मनसे, कोणार्क आघाडी हे वेगळे लढत असताना आता काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षही वेगळे लढणार असल्याने भिवंडीच्या लढती बहुरंगी होतील, असे गुरूवारी स्पष्ट झाले. वेगवेगळ््या पक्षातील उमेदवार फुटावेत यासाठी तुमचा निवडणुकीचा खर्च आम्ही उचलतो असे आमिष दाखवण्यासही सुरूवात झाली आहे. त्यामुले कुंपाणावर असलेले अनेक उमेदवार किती खर्च करणार, असा थेट प्रश्न विचारू लागले आहेत. काही ठिकाणी तर रकमा वाढत गेल्याने उमेदवार रोज वेगळ््या पक्षाचे नाव घेताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)आरोपी प्रशांत म्हात्रे निवडणूक लढवणार भिवंडी : महानगरपालिकेचे सभागृह नेता मनोज म्हात्रे यांच्या खून प्रकरणातील कथित आरोपी प्रशांत म्हात्रे येत्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलयक वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी उमेदवारीवरून झालेल्या वादातून मनोज म्हात्रे यांचा खून झाला होता. त्यामधील आरोपी प्रशांत हा सध्या कैदेत असून तो प्रभाग समिती क्र.२० क आणि ड या दोन वॉर्डातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर विकास पाटील हे भाजपामधून अर्ज दाखल करणार आहेत, तर उमेश भोईर हे काँग्रेसतर्फे रिंगणात उतरणार आहेत. नऊ उमेदवारांचे अर्ज भिवंडी : पालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाच्या नऊ उमेदवारांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. सुहास जालिंदर नकाते यांनी भाजपातर्फे व अपक्ष म्हणून, निशा प्रदीप बोडके, सुशिला प्रभाकर काठवळे यांनी अपक्ष म्हणून, नेहा नवीन काठवळे, संतोष जानू चव्हाण यांनी अपक्ष म्हणून, काँग्रेस पक्षाचे अन्सारी मोहम्मद वसीम मो. हुसेन, शेख नसीम अशफाक यांनी एमआयएमतर्फे उमेदवारी अर्ज भरले.