शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत राष्ट्रवादी स्वबळावर?

By admin | Updated: April 1, 2017 23:22 IST

भिवंडीत भाजपाच्या आघाडीला तोंड देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू असले, तरी या आघाडीत नेमका किती

दीपक देशमुख , वज्रेश्वरीभिवंडीत भाजपाच्या आघाडीला तोंड देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू असले, तरी या आघाडीत नेमका किती वाटा मिळेल, याबाबत संभ्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही स्वबळाची चाचपणी सुरू आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यासाठी भाजपाने विविध पक्षातील अनेक नेत्यांसाठी गळ टाकला आहे. विधानसभा, कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे महापालिकेत ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना हाताशी धरून भाजापाने आपले बळ वाढवले, तसा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण राष्ट्रवादीचे घोडे वरिष्ठ पातळीवर अडल्याने आघाडी होणार नाही, हे गृहीत धरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे.९० नगरसेवक असलेल्या पालिकेत यंदा प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने त्यादृष्टीने राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू आणि महिला अध्यक्ष स्वाती कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले असून १३१ इच्छुकांनी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. सध्या पालिकेत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक असून त्यापैकी तीन जणांनी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीनेही समाजवादीचा एक विद्यमान नगरसेवक आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह शहरातील समाजसेवक, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात घेतले आहे. यात महिलावर्गाचा मोठा समावेश आहे. असे असले तरी अंतर्गत कलहाचा मोठा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. पक्षातील एक गट गुड्डू यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षाकडे ठोस असा कोणताच कार्यक्र म नाही. त्यामुळे मतदारांपुढे तेच तेच मुद्दे घेऊन जाणार असल्याने मतदार राष्ट्रवादीला किती स्वीकारतील हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्यात समाधानाची बाब अशी की राष्ट्रवादीने एक खंबीर धडाडीची महिला शहर अध्यक्ष दिल्याने गेल्या वर्षभरापासून त्यांनी महिलांच्या अडचणी सोडविल्या असल्याने महिला वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊन पक्षात प्रवेश केला आहेत.राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी होण्याची शक्यता नाही. त्यात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसही एकत्र येण्याची चिन्हे नसल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान सेक्युलर मते विभागण्याचे आहे. भाजप शिवसेनेपेक्षा काँग्रेस, समाजवादी हेच राष्ट्रवादीचे मोठे विरोधक या निवडणुकीत असणार आहे. मात्र, सध्या राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसची झालेली अवस्था पाहता राष्ट्रवादीची स्थिती भिवंडीत चांगल्यापैकी आहे. यामुळेच जवळपास २० ते २२ नगरसेवक हमखास निवडून येतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.