शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

"भिवंडी महापालिकेच्या ५० नव्या घंटागाड्या भांडारगृहात धूळखात पडून, खासगी ठेकेदारांवर कोटींची उधळण कशासाठी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 09:05 IST

या घंटागाड्यांसह फायबरची ३० शौचालयेदेखील येथील भांडारगृहात तशीच पडून आहेत. वर्षभरापासून नव्या घंटागाड्या धूळखात ठेवून घंटागाडीच्या खासगी ठेकेदारांवर मनपा प्रशासन कोटींची उधळण का करते आहे, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत व सिद्धेश्वर कामूर्ती यांनी केला आहे. 

नितीन पंडित -

भिवंडी: भिवंडी महापालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या आणि फायबरची शौचालये वर्षभरापासून धूळखात पडली आहेत. शहरातील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी पालिकेने तब्बल ५० घंटागाड्या मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात खरेदी केल्या. त्यासाठी तीन कोटी २५ लाख रुपये पालिकेने खर्च केले. वर्ष उलटूनही या घंटागाड्या कोंबडपाडा येथील भांडारगृहात धूळखात पडल्या आहेत.

या घंटागाड्यांसह फायबरची ३० शौचालयेदेखील येथील भांडारगृहात तशीच पडून आहेत. वर्षभरापासून नव्या घंटागाड्या धूळखात ठेवून घंटागाडीच्या खासगी ठेकेदारांवर मनपा प्रशासन कोटींची उधळण का करते आहे, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत व सिद्धेश्वर कामूर्ती यांनी केला आहे. महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या ५० घंटागाड्या असतानाही खाजगी ठेकेदाराकडून भाडेतत्त्वावर घंटागाड्या घेऊन महिन्याला या खासगी घंटागाड्यांच्या भाड्याच्या बिलांवर लाखो रुपयांचे बिल दिले जात आहे. त्यामुळे पालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याची बाब काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी उघड केली आहे. 

शाैचालये भंगारात जाण्याची शक्यता  पालिकेच्या घंटागाड्यांचा वापर केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही. खाजगी कंत्राटदाराचे आणि पालिकेचे साटेलोटे असल्यानेच घंटागाड्या वापरल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्याबरोबरच फायबर शौचालयांचा वापर लवकर न केल्यास ती भंगारात जाण्याची शक्यता आहे. घंटागाड्या मनपा प्रशासनाने लवकरात लवकर त्या उपयोगात आणाव्यात. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशाराही अरुण राऊत व सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दिला.

आवश्यक मनुष्यबळ नाहीनव्या घंटागाड्यांसाठी चालक व इतर आवश्यक मनुष्यबळ अजूनही उपलब्ध झाले नाही. चालक व मनुष्यबळ पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून चार ते पाचवेळा टेंडर काढण्यात आले आहेत. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. आता नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. महासभेची मंजुरी मिळाली तर महिनाभरात या गाड्या वापरात आणण्यात येतील, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी