शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल

वसई : पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल काढण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या पाणजू गावातील पाणी आणि वीज पुरवठा लवकरच खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.चारही वाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर नरवीर चिमाजी आप्पांच्या काळापासून वस्ती आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी बोटीचाच पर्याय आहे. रेल्वेचा वावर सुरु झाल्यानंतर ब्रिटीशांनी वसई खाडीवर उत्तर आणि दक्षिणेला दोन पूल बांधले होते. या पुलावरून नायगांव किंवा भार्इंदर रेल्वे स्थानकावरून चालत गावात पोहोचण्याची दुसरी व्यवस्था झालेली आहे. १९७१ साली या गावाला स्टेम प्राधिकरणामार्फत रेल्वेपुलावरून भार्इंदरमार्गे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानतंर १९८६ मध्ये पूलावरूनच केबल टाकून महावितरणने वीजपुरवठाही केला आहे. या दोन्ही वाहिन्या जुन्या पुलांवरून करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशकालिन पूल धोकादायक असल्याने रेल्वेने विरार-बोरीवली चौपदरीकरणात दुसरे दोन पूल बांधले. त्यानंतर दोनही पूलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. दोन्ही पूल दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. पण, पूल धोकादायक असल्याने रेल्वेने सुरक्षिततेत्या कारणास्तव ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मदतीने वसई आणि भार्इंदर दरम्याने वाहतूकीसाठी नवे पूल बांधण्याचा प्रस्तावही तयार केला होता. पण, प्रचंड खर्च असल्याने त्याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हा पूल पाणजूकरांसाठी दळणवळण आणि इतर सोयी-सुविधांसाठी उपयुक्त होता. आता नवा पूलही होण्याची चिन्हे दिसत नसताना रेल्वेने आपले दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाला १६० मिलीमिटर व्यासाची पाईपलाईन आणि महावितरण कंपनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबल तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.के.अग्रवाल यांनी दिले आहेत. या निर्देशामुळे पाणजुकरांची वीज आणि पाणी हिरावली जाणार आहे. (प्रतिनिधी)