शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मीटरमुळे भाईंदरला पाणीकपात

By admin | Updated: March 31, 2016 02:51 IST

शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत

भार्इंदर : शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. या तांत्रिक पाणीकपातीची समस्या महापौर गीता जैन यांनी स्टेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत सदोष मीटरची दुरुस्ती करण्याची मागणी स्टेमकडे केली आहे.शहराला स्टेमद्वारे ८६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. स्टेमच्या अभियंत्यांनी मीरा-भार्इंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या चेना येथील मुख्य जलवाहिनीवर बसवलेल्या मीटरची नुकतीच चाचपणी केली. त्या वेळी त्यांनी मीटरमधील काही तांत्रिक दोष दुरुस्त करून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मोजणीला सुरुवात केली. मीटर दुरुस्तीनंतर प्रत्यक्षात होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० ते १५ एमएलडीची घट होऊनही मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित याची माहिती स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल चौधरी व महाव्यवस्थापक शशिकांत साळुंखे यांना देत मीटर दुरुस्तीची मागणी केली. त्यावर, दोन्ही प्रशासनांत वाद निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने थेट महापौरांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार, महापौर गीता जैन यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदोष मीटरची दुरुस्ती करून शहराच्या वाट्याला मिळालेले पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या सदोष मीटरच्या दुरुस्तीसाठी स्टेमचे अधिकारी येणार असून आठ दिवसांपासून सुमारे १२० एमएलडी कमी मिळालेल्या पाण्यावरही चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. याला स्टेमच्या महाव्यवस्थापकांनीसुद्धा दुजोरा दिला. काही दिवसांतच सदोष मीटर बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)