शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सेनेशी गद्दारी कराल तर खबरदार

By admin | Updated: April 1, 2017 05:45 IST

मीरा-भार्इंदरमधील भाजपात आयारामांची संख्या सर्वाधिक असून शिवसेनेचा क्रमांक त्यापाठोपाठ लागतो

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील भाजपात आयारामांची संख्या सर्वाधिक असून शिवसेनेचा क्रमांक त्यापाठोपाठ लागतो. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याची गद्दारी केल्यास त्यांना सेना स्टाइलने जागा दाखवू, असा इशारा शहर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीत हा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना पक्षांतराला काही दिवसांपासूनच सुरुवात झाली आहे. त्यात, सेनेतून भाजपाच्या वाटेवर असलेल्या दोन ते चार नगरसेवकांना उद्देशून सरनाईक यांनी सेनेतील सरसकट नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्याचा धसका त्या नगरसेवकांनी चांगलाच घेतला आहे. त्यांनी शिवसेनेतच राहण्याचा निर्णय जाहीरही करून टाकला.पालिकेत सध्या सर्वात मोठा पक्ष भाजपा असून कमळाला पाणी घालण्यासाठी इतर पक्षांतील बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी आसुसलेले आहेत. अलीकडेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही दिग्गज व ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. या वेळी सेनेतील दोन विद्यमान नगरसेवकही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी प्रभागरचनेनंतर पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. शिवसेनेचे सध्या १४ नगरसेवक असून मनसेचे एकमेव नगरसेवक अरविंद ठाकूर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेच्या नगरसेवकांची संख्या १५ झाली आहे. (प्रतिनिधी)२२ एप्रिलला अनेकांचा शिवसेनेत प्रवेशआयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्याने पक्षांतराच्या तयारीत असलेले सेनेतील नगरसेवक भाजपात जाण्याची कुणकुण सरनाईक यांना लागली. त्यांनी हाटकेश येथील जनसंपर्क कार्यालयात दोन दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांची गोपनीय बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्ष सोडून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या त्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यामुळे ते नगरसेवक शांत होत इतर पक्षांतील नगरसेवकांना सेनेत आणण्यासाठी प्रयत्नशील झाल्याचे सांगण्यात येत आहे. २२ एप्रिलला सेनेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमात इतर पक्षांतील नगरसेवकांचा व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.