शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

लाभार्थ्यांना फेब्रुवारीत घरे

By admin | Updated: January 12, 2017 07:08 IST

बीएसयूपी योजनेतील एका आठ मजली इमारतीचे काम सात वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण होत आले आहे.

भार्इंदर : बीएसयूपी योजनेतील एका आठ मजली इमारतीचे काम सात वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण होत आले आहे. त्यात एकूण ४ हजार १३६ पैकी १७९ लाभार्थ्यांना फेब्रुवारीत सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु, इमारतीतील १०० टक्के सदनिका लाभार्थी आदिवासींनाच मिळाव्यात, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केल्यामुळे सदनिकावाटपाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी या सदनिकांचे वाटप दिवाळीत होेणार होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे त्याचा मुहूर्त टळला. यंदा फेब्रुवारीत सदनिका देण्याचे निश्चित केले आहे. या सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने होणार आहे. २००९ मधील महासभेने काशिमीरा परिसरातील जनतानगर व काशीचर्च परिसरात बीएसयूपी योजना राबवण्यास मान्यता दिली. यात एकूण ४ हजार १३६ लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आले. त्यात जनतानगरमधील ३ हजार ६६५ व काशीचर्चमधील ४७१ लाभार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला या योजनेला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्याने योजना रेंगाळली होती. त्याला अनेकदा मुदतवाढ मिळाल्यानंतर यंदाची मुदतवाढ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. सुमारे ३३० कोटींची योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. अखेर, २०१३ मध्ये लाभार्थ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. त्यात विकासकांनीही आर्थिक अडचणींमुळे योजना ताटकळत ठेवली होती. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे योजनेचा खर्च वाढला. त्यामुळे पालिकेने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवला. त्याच्या कामात बदल करून सुरुवातीला बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी आठ मजल्यांच्या २३ इमारतींऐवजी दोन आठ मजल्यांच्या इमारतींसह १६ मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित केले. त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाने जनतानगरमध्ये जुलै २०१५ मध्ये अर्धवट बांधकाम झालेली एक आठ मजली इमारत पूर्ण केली. या इमारतीतील एकूण १७९ सदनिकांचे वाटप यंदाच्या फेब्रुवारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या इमारतीत ५० आदिवासी लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आल्याचे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)