शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईला सुरुवात

By admin | Updated: May 7, 2017 05:56 IST

शहरातील वालधुनी नदीपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नालेसफाई वर्षभर चालणार असून महापौर मीना आयलानी, उपमहापौर

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नालेसफाई वर्षभर चालणार असून महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत नालेसफाईला सुरुवात झाली. वालधुनी नदीच्या सफाईला आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. महापालिकेने वालधुनी नदीत जेसीबी मशीन उतरवून पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची सुरुवात केली. वर्षातून तीन टप्प्यांत म्हणजे तब्बल ९० दिवस नालेसफाई होणार असून लहान नाल्याची सफाई कंत्राटी कामगाराकडून होणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. सकाळी ११ वाजता महापौर आयलानी, उपमहापौर इदनानी, आयुक्त सुधाकर शिंदे, केणे, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक गजानन शेळके, टोनी सिरवानी, शिवाजी रगडे आदी उपस्थितीत होते. वालधुनी नदीला अतिक्रमणाचा विळखा पडल्याने नदीचे पात्र उथळ व अरुंद झाले. नदीच्या पुराचे पाणी दरवर्षी सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, सीएचएम कॉलेज, हिराघाट, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, शांतीनगर परिसरात शिरते. यामुळे संसार उघड्यावर पडतो. नदीच्या दोन्ही बाजूंना उंच भिंत बांधण्याची मागणी माजी नगरसेविका सुमन शेळके, माजी नगरसेवक महादेव सोनावणे यांनी पालिकेकडे लावून धरल्यानंतर काही ठिकाणी तुकड्यांमध्ये संरक्षण भिंत बांधली. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याने पुरात वाहून जातात की काय, अशी स्थिती संरक्षण भिंतीची झाली आहे. वालधुनी नदीसह खेमाणी नाला, गायकवाडपाडा नाला, गुलशननगर नाला आदी नाल्यांसह अंतर्गत लहान नाल्यांची सफाई सलग ४५ दिवस सुरू राहणार आहे. नालेसफाईसाठी अडीच कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे फोटो कंत्राटदाराला बिलासोबत लावणे बंधनकारक आहे.