शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मैल्यामुळे राघोनगरमध्ये आरोग्याचा प्रश्न

By admin | Updated: August 13, 2015 23:19 IST

कल्याण (पू), प्रभाग क्र. ५५, मंगल राघोनगरमधील चाळींचे मैलायुक्त सांडपाणी बाजूच्या गटारात सोडल्यामुळे सफाई कामगारांना त्यात हात घालून स्वच्छता करावी लागते

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडीकल्याण (पू), प्रभाग क्र. ५५, मंगल राघोनगरमधील चाळींचे मैलायुक्त सांडपाणी बाजूच्या गटारात सोडल्यामुळे सफाई कामगारांना त्यात हात घालून स्वच्छता करावी लागते. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आनंद सदन, गंगुबाई अपार्टमेंट व अजिंक्यतारा सोसायटी इ. भागांत ही दुरवस्था आहे.प्रभागात ९० टक्के चाळी व १० टक्के इमारती आहेत. गणेशनगर, मंगल राघोनगर, रघुनाथनगर, चिकणीपाडा हे प्रमुख निवासी विभाग आहेत. मागासवर्गीय ३५ टक्के, दक्षिण भारतीय १५ टक्के, उत्तर भारतीय १० टक्के, मुस्लिम २ टक्के, अन्य ३८ टक्के असे लोक या प्रभागात राहतात. ज्या भागात मलवाहिन्या टाकण्यायोग्य परिस्थिती होती, तेथे मलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, अडचणीच्या ठिकाणामुळे मेमन कॉटेज, भोईर चाळ, वेणुबाई निवास येथे मलवाहिन्या टाकल्या नाहीत, असे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या प्रभागातील आरक्षण क्र. ४४९ व क्र. ४५१ या उद्यानासाठी असलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, म्हणून एके काळी प्रयत्न झाले. म्हणून, थोडीफार तरी मोकळी जागा राहिली आहे. ही जागा मनपाने ताब्यात घ्यावी, अशी जनतेची मागणी आहे.या प्रभागात २ कूपनलिका असून त्यापैकी पिंकी अपार्टमेंट येथे असलेली कूपनलिका बंद आहे. २००९ साली मंजुरी घेतलेल्या जलकुंभाचे बांधकाम २०१२ साली पूर्ण झाले, तेव्हापासून अर्धे मंगल राघोनगर व पूर्ण गणेशनगरला ६ व ८ इंची जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गणेशनगर भागातील नागरिकांनी अधूनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार आहे.साई मंदिराच्या परिसरात भौगोलिकदृष्ट्या सखल भाग असून गटारे तुंबून अतिवृष्टीमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरते, असे तेथील लोकांनी सांगितले. पर्णकुटी रोड, चिकणीपाडा ते तिसगाव रोड, आझाद प्लंबरपर्यंत ६ फुटी रुंदीचा बंदिस्त नाल्याचे बांधकाम सुरु झाले. मात्र, पुढे तो अर्धवटच सोडून दिला आहे. गणेशनगर, आनंद सदन, समता सोसायटी, श्रीनाथ सोसायटी येथील चाळींमधील गटारे खुली असून त्यावर झाकणांची गरज आहे. उत्कर्ष समितीच्या कार्यालयासमोर वाचनालय बांधले होते. मात्र, विरोधकांनी ते नष्ट केल्याची तक्रार वाचनप्रेमींनी केली. चंद्रपुष्प हा.सो.समोर जीवदानी मंदिराजवळ, काळू अपार्टमेंट बी विंगसमोर, तिसाई सर्व्हिस सेंटरसमोर चिखल, दलदल, अस्वच्छतेचे वातावरण होते. रीना को-आॅप. हा.सो.च्या बाजूला असलेला नाला अस्वच्छ होता. सद्गुरू एंटरप्रायजेससमोर प्रकल्पाचे काम होऊनसुद्धा ३ मोठे पाइप पडून आहेत. विकास आराखड्यानुसार या प्रभागात एकही नवा रस्ता नाही. मात्र, कलम २१० अन्वये रस्ते बांधले आहेत. खाजगी सोसायट्यांमध्ये पेव्हरब्लॉक भरपूर टाकण्यात आले आहेत.