शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तलावांचे सुशोभीकरण

By admin | Updated: June 20, 2017 06:26 IST

शहरातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये ‘काहीतरी कर ठाणेकर’, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने या तलावांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये ‘काहीतरी कर ठाणेकर’, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने या तलावांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेऊन तसा आराखडाही तयार केला होता. आता प्रत्यक्षात तो मूर्त स्वरूपात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यामध्ये मासुंदा तलावाबरोबरच कौसा, खारेगाव, न्यू शिवाजीनगर (कळवा), कचराळी, मखमली, फडकेपाडा या तलावांचे सुशोभीकरण आणि निगा देखभालीसाठी भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.शहरात आजघडीला ३५ तलाव आहेत. यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच तलाव चांगल्या स्थितीत आहेत. परंतु, उर्वरित तलावांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी लोकमतने काहीतरी कर ठाणेकरच्या माध्यमातून तलावांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वाचा फोडली होती. तसेच कचराळी तलावाबाबतदेखील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कचराळी तलावाचे अवघे १५ दिवसांत रूपडे पालटले होते. तसेच उर्वरित तलावांचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे कामही सुरू केल्याचे स्पष्ट केले होते. आता टप्प्याटप्प्यांनी शहरातील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, मासुंदा तलावाच्या ठिकाणी १५ वर्षे कराराच्या कालावधीवर या भागात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, फूड कोर्ट उभारणे, साउंड प्रकारचा कारंजा उभारणे, लहान मुलांसाठी चिल्डेन प्ले एरिया तयार करणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवणे, बोटिंग आणि मासेमारी अशा प्रकारे निगा देखभालदेखील खाजगी ठेकेदाराला दिली जाणार आहे.