शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारणाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

--------------------------------- कार चोरीला कल्याण : पश्चिमेतील रामबाग येथील पुरंदरे कॉलनी परिसरातील यशोदा अपार्टमेंटमध्ये राहणारे तेजस साळुंखे यांनी त्यांची ...

---------------------------------

कार चोरीला

कल्याण : पश्चिमेतील रामबाग येथील पुरंदरे कॉलनी परिसरातील यशोदा अपार्टमेंटमध्ये राहणारे तेजस साळुंखे यांनी त्यांची कार ते राहत असलेल्या परिसरात पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

---------------------------------

चोरट्यांकडून रिक्षा लक्ष्य

कल्याण : राकेश भोईर यांनी त्यांची रिक्षा सूचकनाका परिसरात पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. त्याच ठिकाणी मनोज वाघमारे यांचीही रिक्षा पार्क होती. परंतु, त्या रिक्षाची बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

-------------

सोन्याचे दागिने लंपास

डोंबिवली : पूर्वेतील शेलार चौक परिसरात राहणारी शोभा निकाळजे ही तरुणी आईसमवेत बुधवारी सकाळी १०.४५ च्या दरम्यान त्रिवेणी ज्वेलर्समधून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन घरी परतत होती. त्यापूर्वी चिमणी गल्लीत त्या दोघी भाजी खरेदी करीत असताना शोभा यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली प्लास्टीक पिशवी चोरट्याने दोघींच्या नकळत लंपास केली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : पूर्वेतील कल्याण-शीळ रोडवरील माणगाव येथील विष्णू व्हॅली येथे राहणारे संतोष तांबे यांनी त्यांची दुचाकी कस्तुरी प्लाझा समोर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० ते ८.३० च्या दरम्यान घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------