शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी गेलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. डोक्यावरील छत जाणार या चिंतेत रहिवासी आहेत. रहिवाशांचे म्हणणे ऐकण्यासाठी गुरुवारी आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे हे घटनास्थळी आले व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते. त्याचवेळी संतप्त जमावाने एमएमआरडीएचे अधिकारी मिलिंद प्रधान यांना पोलिसांच्या उपस्थितीतच मारहाण केली.

काल्हेर-कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी बहुतांश इमारती या एमएमआरडीएने बेकायदा ठरविल्या असून, त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार १ जूनपासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू आहे. काही इमारतींना अवघ्या २४ तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी २००हून अधिक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कारवाईमुळे हजारो कुटुंब बेघर होणार आहेत. आम्ही मुद्रांक शुल्क भरून बँकेतून कर्ज घेऊन हे फ्लॅट खरेदी केले आहेत, त्यावेळी या इमारती बेकायदा नव्हत्या का ? जेव्हा बांधकाम सुरू होते त्यावेळेस एमएमआरडीएचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित करत आम्हाला कोरोनामुळे नाहीतर या इमारती तोडल्याने मरण येणार अशी व्यथा महिलांनी बोलून दाखविली.

कशेळी-काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत घरे मिळत आहे. बाळकूम येथील एका मोठ्या बिल्डरच्या ५० लाखांच्या घराला ग्राहक मिळत नसल्याने राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर, कशेळी या भागांतच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केला आहे. एमएमआरडीए अधिकारी येथील विकासकांकडून पैसे उकळत असून, पैसे न देणाऱ्या बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एनए झालेल्या खासगी जागा आहेत. त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली आहे. घरासाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचे सांगत ही कारवाई थांबली नाही तर यापुढे आम्ही आत्मदहन करू, असा इशाराही थळे यांनी दिला आहे.

---------------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांना सांगणार रहिवाशांच्या व्यथा

एमएमआरडीए ही कारवाई आकसापोटी करत असल्याचा आरोप आमदार शांताराम मोरे यांनी केला. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येथील रहिवाशांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे सांगत येथील परिस्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.