शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाण्यासाठी बारवी धरणावर मदार

By admin | Updated: November 17, 2015 00:52 IST

यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य

- पंकज पाटील,  अंबरनाथयंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य असल्याने बारवी धरणाची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त पाणी साठ्यावर आरक्षण सांगण्याची धडपड जिल्ह्यातील सर्व शहरांनी सुरु केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढविण्यात आली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता होती. आता अलीकडेच धरणाची उंची ९ मीटर वाढविल्याने हीच क्षमता दुप्पट झाली. आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाची उंची वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलीत दरवाजांचे कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपरिषदांना पाण्याची गरज भासणार आहे अशा महापालिका आणि नगरपरिषदांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्ताव पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापािलका क्षेत्रांचा आणि नगरपरिषदेचा विस्तार वाढत असल्याने शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी या पालिका बारवी धरणाच्या वाढीव पाणीसाठ्याच्या आरक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरु झालेले नाही. वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हासनदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. उल्हासनदीवरील पाण्याचे आरक्षण आधीच पूर्ण झालेले असल्याने आता बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे त्यावरच जिल्ह्याची तहान भागविली जाणार आहे.