शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’शी खाती जोडून घेण्याचे बँकांना निर्देश

By admin | Updated: April 1, 2017 05:54 IST

ठाणे जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुमारे १९ लाख ८७ हजार खाती असून त्यापैकी ११ लाख २५ हजार २५० बँक खाती आधार क्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुमारे १९ लाख ८७ हजार खाती असून त्यापैकी ११ लाख २५ हजार २५० बँक खाती आधार क्र मांकाशी, तर १७ लाख ८८ हजार ३०० खाती मोबाइल क्र मांकाशी जोडलेली आहेत. तसेच उर्वरित खाती संबंधित बँकांनी त्वरित आधार क्र मांक आणि मोबाइलशी जोडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. तर, मार्चपर्यंत १०० टक्के खाती आधारसंलग्न करण्यासाठी विशेष मेळावे, कार्यक्र म घ्यावेत, असे लीड बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजन जोशी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.डिजिटल पेमेंट सुविधांमध्ये आधार क्र मांक अत्यंत महत्त्वाचा असून बँकांनी सर्व खाती आधारशी जोडणे आवश्यक आहे. ९० टक्के खाती मोबाइलशी जोडली गेली असली, तरी अद्यापही जिल्ह्यातील ८ लाख ६१ हजार ७५० बँक खाती आधारशी जोडलेली नाहीत. ती त्वरित लिंक करण्यासाठी बँकांनी अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी डिजिटल पेमेंटपद्धतीचे व्यवहार करावेत, असेही त्यांनी या वेळी सूचित केले. आतापर्यंत ८५२ विविध बँक शाखांनी आधार क्र मांक जोडणीसाठी विशेष मेळावे घेतले आहेत, अशी माहिती या वेळी दिली. त्याचबरोबर, रोखमुक्त अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मध्यंतरीच्या चलनबदलाच्या काळात बँकांनी अत्यंत संयमाने व परिश्रमपूर्वक परिस्थिती हाताळली, याबद्दल प्रशासनाच्या वतीने बँकांचे अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या काळातही डिजिटल पेमेंट चळवळीला गती देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) राज्यात कामगिरी चांगलीठाणे जिल्ह्यामध्ये पंतप्रधान जनधन योजनेत तब्बल ११ लाख ८७ हजार ६८७ बँक खाती उघडल्याची माहिती या वेळी राजन जोशी यांनी दिली. त्या माध्यमातून बँकांमध्ये ३५७ कोटी २९ लाख रु पये जमा झाले आहेत. राज्यात ही कामगिरी चांगली आहे.