शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बळीराजाला यंदा तुरीचा आधार; चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:45 IST

शेतकऱ्यांना दिले होते मोफत बियाणे

बदलापूर : अतिवृष्टीमुळे यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाला यंदा तुरीने मोठा आधार दिला आहे. अंबरनाथ तालुक्यात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात आली असून यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे. सत्तर टक्क्यांहून अधिक भातपीक अतिवृष्टीमुळे वाया गेले असले तरी शेताच्या बांधावर लावलेल्या तूर लागवडीतून त्याची भरपाई होण्याची चिन्हे आहेत.खरीप हंगामात भाताबरोबरच यंदा अतिरिक्त पीक म्हणून मोठ्या प्रमाणात तूर लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ४ हजार १३७ किलो तुरीचे बियाणे विनामूल्य देण्यात आले. ठाणे जिल्ह्यात ३ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रात त्याची लागवड करण्यात आली. तुरीचे पीक हाती यायला सहा महिने लागतात. लवकरच तुरीची कापणी होणार असून शेतकऱ्यांच्या हाती चांगले पीक येणार आहे. साधारणपणे हेक्टरी ४०० किलो तूर मिळते. यंदा अंबरनाथ तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड झाल्याने तुरीच्या उत्पादनाचा विक्रम होण्याची शक्यता आहे.मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात यंदा शेताच्या बांधावर तुरीची लागवड करण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रोत्साहन म्हणून ही योजना राबविण्यात आली. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घ्यावे, याकरिता गावागावात जाऊन शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले होते. पिंपळोली वाडीतील प्रगतशील शेतकरी बारकुभाऊ उघडे यांनी यंदा त्यांच्या शेताच्या बांधावर तूर लागवड केली आहे. तुरीला खेकड्यांपासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा विशिष्ट अंतरावर, शेताच्या बांधावर प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवून त्यात रोप लागवड करण्यात आली होती. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तूर लागवड केल्याने रोपे जगली आणि त्यांची चांगली वाढ झाली, म्हणून यंदा तुरीचे पीक चांगले आल्याचे बारकुभाऊ उघडे यांनी सांगितले.पिकाची निगा राखण्याबाबत प्रशिक्षण बीडीएन ७११ या जातीचे तुरीचे बियाणे शासनाने शेतकऱ्यांना विनामूल्य शेताच्या बांधावर उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर तूर लागवड करण्यापासून कापणीपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले. पिकाची निगा कशी राखायची, याचेही प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन होणार असल्याचा विश्वास कृषी अधिकारी सचिन तोरवे यांनी व्यक्त केला.