शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नदीनाका - पारोळ रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रोहिदास पाटील अनगाव - भिवंडी तालुक्यातील नदीनाका ते पारोळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रोहिदास पाटील

अनगाव - भिवंडी तालुक्यातील नदीनाका ते पारोळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून येजा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या भिवंडी-वाडा महामार्गावरील नदीनाका येथून सुरू होणाऱ्या रस्त्यावरील तळवली , जुनादुर्खी, लाखीवली, नादा, चिबीपाडा आदी ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सतत वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असल्याने या खड्डयांतून वाट काढताना वाहनचालक हैराण होतात. या खड्डयांत वाहने आदळून अपघाताच्या घटना घडतात. यात अनेकजण जखमी तर काहींचा मृत्यू झालेला आहे.

दरवर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रूपये खर्च केला जातो, मात्र दुरूस्ती व्यवस्थित होते की नाही? नसेल तर तो निधी जातो कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याकडे भिवंडी सार्वजनिक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे, असा आराेपही स्थानिक करताहेत.

--------

अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

या रस्त्याची आठ दिवसात दुरूस्ती न केल्यास श्रमजीवी संघटना रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे शहर तालुका अध्यक्ष सागर देसक, उपाध्यक्ष प्रदिप चौधरी, तानाजी लहागे, सचिव मोतीराम नामकूडा, संघटक यशवंत भोईर, आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

-------

नदीनाका- पारोळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत, हे खरे आहे. संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी सूचना दिल्या आहेत. लवकरच काम सुरू होईल.

- अनिल पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिवंडी

-----------

दुचाकी पळवली

अनगाव - भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आसतानाच बागेफीर्दोस मस्जिद जवळ उभी करून ठेवलेली मुनाफ पटेल यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.