शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या कटआॅफमध्ये ठाण्याची कॉलेज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:35 IST

अकरावी प्रवेशाची दुसरी कट आॅफ लिस्ट बुधवारी रात्री उशिराने आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीच्या तुलनेत ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अकरावी प्रवेशाची दुसरी कट आॅफ लिस्ट बुधवारी रात्री उशिराने आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीच्या तुलनेत ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कट आॅफ दुसऱ्या यादीत घसरला आहे. पहिल्या यादीत मात्र, कट आॅफबाबतीत मुंबईतील महाविद्यालयांच्या बरोबरीने ठाण्यातील महाविद्यालये होती. विविध कारणास्तव अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया लांबली, तर पहिली कट आॅफ लिस्टही दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने प्रसिद्ध झाली. त्यामुळे जाहीर केल्यानुसार दुसरी कट आॅफ तरी गुरुवारी सायंकाळी वेळेवर प्रसिद्ध होते का, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, शिक्षण विभागाने दुसरी कट आॅफ लिस्ट वेळेआधी अर्थात बुधवारी रात्री प्रसिद्ध केली. वेळेआधी प्रसिद्ध केलेल्या यादीनेही काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. दुसऱ्या यादीनुसार ठाण्यातील महाविद्यालयांत विज्ञान शाखेत बांदोडकर महाविद्यालयाचा कट आॅफ सर्वाधिक म्हणजे ९०.२ टक्के इतका आहे. ठाण्यातील केवळ बांदोडकर महाविद्यालयाचाच कट आॅफ दुसऱ्या यादीतही मुंबईतील महाविद्यालयांच्या जवळपास स्थिरावलेला दिसतो. त्या खालोखाल उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय ८९.६ टक्के, बिर्ला महाविद्यालय ८८.२ टक्के, पेंढरकर महाविद्यालयाचा ८४.२ टक्के, तर ज्ञानसाधना महाविद्यालयाचा ७५.६ टक्के कट आॅफ आहे. वाणिज्य शाखेत ८६.८ टक्क्यांसह ठाण्यात बेडेकर महाविद्यालयच सरस ठरले असले तरी मुंबईतील नामांकित ८ महाविद्यालयांचा कट आॅफ यापेक्षा अधिक आहे. बेडेकरखालोखाल सीएचएमचा कट आॅफ ८० टक्के आहे. पहिल्या लिस्टच्या तुलनेत दोन्ही महाविद्यालयांच्या कट आॅफमध्ये सुमारे एक टक्क्याचाच फरक दिसतो आहे. बिर्लाचा कट आॅफ ७९.४ टक्के, तर पेंढरकरचा ७७ टक्के इतका आहे. कला शाखेच्या कट आॅफमध्ये सरासरी ४-५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ठाण्यात के.जी. जोशी महाविद्यालयाचा कट आॅफ सर्वाधिक म्हणजे ७४ टक्के इतका आहे. जोशी महाविद्यालयापेक्षा मुंबईतील सुमारे ९ महाविद्यालयांचा कट आॅफ जास्त आहे. बिर्ला महाविद्यालयाचा ६५.८ टक्के, पेंढरकरचा ६४.४ टक्के तर सीएचएमचा ५५.६ टक्के इतका कट आॅफ आहे.