शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रोथ सेंटरबाबत जागृती करा’

By admin | Updated: February 21, 2017 05:27 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १० गावे राज्य सरकारने ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १० गावे राज्य सरकारने ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे ती एमएमआरडीएच्या अधिपत्याखाली आली आहेत. या ग्रोथ सेंटरबाबत जागृती करा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने एमएमआरडीएला दिला आहे.राज्य सरकारच्या ३० एप्रिल २०१६ च्या अधिसूचनेनुसार २७ गावांपैकी १० गावे ग्रोथ सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये विकासाभिमुख प्रकल्प राबवले जात आहेत. याबाबत, स्थानिक भूमिपुत्र अनभिज्ञ असल्याचे युवा मोर्चाचे म्हणणे आहे. ग्रोथ सेंटर घोषित होऊन नऊ महिने उलटूनही या विकासाभिमुख प्रकल्पांविषयी जागृती झालेली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. १० गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहेत. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आजपर्यंत या प्रकल्पांविषयी सरकारचे धोरण स्पष्ट झालेले नाही. ग्रोथ सेंटरबाबत लवकरात लवकर जागृती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करून बाधित जमिनीच्या मोबदल्याचे स्वरूप स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा आपल्या कार्यालयावरही आंदोलन छेडले जाईल, असा इशारा एमएमआरडीएला दिला आहे. याआधीही दोन वेळा पत्रव्यवहार केल्याचे युवा मोर्चाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)भूमिपुत्र अनभिज्ञस्थानिक भूमिपुत्रांना ग्रोथ सेंटर म्हणजे काय, हे अजूनही कळलेले नाही. हा प्रकल्प भूमिपुत्रांच्या हिताचा आहे की बिल्डरधार्जिणा, असा सवालही उपस्थित होत आहे. धोरण स्पष्ट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व द्वेषाचे वातावरण पसरले आहे, असे युवा मोर्चाने पत्रात म्हटले आहे.