शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्मी चक्कर’मधून आठवणी जागृत

By admin | Updated: September 13, 2016 02:17 IST

गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून

ठाणे : गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांची दाद मिळवून गेला. ‘शोले ते थ्री इडिएट’ तसेच ‘अमिताभ ते टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपट व अभिनेत्यांची आठवण कट्ट्याच्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून करून दिली.मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आता इतकी जवळ आली आहे की, जास्तीतजास्त मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली दमदार सुरुवात करावी, या हेतूने कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी ‘फिल्मी चक्कर’ ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे. त्याचा पहिला प्रयोग रविवारी पार पडला. हिंदी जुन्या व नवीन चित्रपटांतील अजरामर प्रसंगांचे सादरीकरण कट्ट्याच्या कलाकारांनी केले. त्यामध्ये दीपक मुळीक व अश्विनी जगताप यांनी ‘एअरलिफ्ट’, गणेश गायकवाड व नवनाथ कंचार यांनी ‘अग्निपथ’, स्वप्नील काळे, प्रणव दळवी व परेश दळवी यांनी ‘थ्री इडिएट’, वीणा छत्रे हिने ‘दामिनी’, नवनाथ कंचार याने शोले चित्रपटातील ‘गब्बरसिंग’, शिल्पा लाडवंते, वैभवी वंजारे व मधुरा सावंत यांनी ‘रिश्ते’, मयूरेश जोशी, नितेश कदम, शिवानी देशमुख, आरती ताथवडकर, विजय माने, प्रशांत सकपाळ, मधुरा सावंत यांनी ‘स्वर्ग’, वैभव चव्हाण व योगेश मंडलिक यांनी ‘बिल्लू बारबर’, वैभव जाधव व रोहित अहिरे यांनी शोले चित्रपटातील जयविरू, रूपेश बने याने ‘टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपटांतील भूमिका उत्तम साकारून उपस्थितांची दाद मिळवली.